शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीमंतां’साठी शहराची वाट लावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:07 IST

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरिबांची घरे ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली उद्ध्वस्त केली, फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील काँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. श्रीमंत कोल्हापूर करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये, असे ...

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरिबांची घरे ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली उद्ध्वस्त केली, फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील काँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. श्रीमंत कोल्हापूर करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये, असे आवाहनही आघाडीने केले आहे.मंगळवारी मंत्रालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याने त्यावर कारवाई करू नये, असे राज्य सरकारने निर्देश दिल्यामुळे त्याची प्रतिक्रिया महानगरपालिका वर्तुळात उमटली. याचा काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महापौर स्वाती यवलुजे, शिक्षण मंडळ सभापती वनिता देठे, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख, माजी सभापती संदीप नेजदार, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, संजय मोहिते यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील व आमदार महाडिक यांना श्रीमंतांना एक आणि गरिबांना एक न्याय द्यायचा आहे. एकीकडे शहरात गरिबांवर कारवाई झाली त्यावेळी ही मंडळी कुठे होती. त्यावेळी त्यांना कळवळा आला नाही. गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या श्रीमंतांची बाजू घेऊन मतांचे राजकारण करताना मात्र कळवळा आला. नियम न पाळता जर इमारती बांधल्या असतील तर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे, अशी अपेक्षा शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केली.येथून पुढे शहरात अतिक्रमण काढण्याची विनापरवाना बांधकामे तोडण्याची मोहीम मनपा प्रशासनाने हाती घेतली तर पक्ष म्हणून नाही तर नगरसेवक म्हणून रस्त्यावर उतरून ही कारवाई बंद पाडू, असा इशारा देशमुख यांनी दिला. यावेळी संरक्षण नाकारणाऱ्या पोलीस प्रशासनाचाही निषेध करण्यात आला.तेथे कचरा टाकणार : महापौरशहरात एकीकडे कचरा टाकण्यास जागा नाही, आणि दुसरीकडे कचरा डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील झालेली अतिक्रमणे तोडू नका, असा आदेश दिला जातो ही लाजीरवाणी बाब आहे. जी जागा कचरा डेपोसाठी आरक्षित आहे, तेथे यापुढे कचरा नेऊन टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले जातील, असे महापौर यवलुजे यांनी सांगितले.