शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

सत्कारात वेळ घालवू नका

By admin | Updated: July 1, 2015 00:39 IST

पाटील यांच्या डकरेंना सूचना : निवडीनंतर ‘स्मार्ट सिटी’साठी बैठकीचे आयोजन

कोल्हापूर : शहराच्या नूतन महापौरांना महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दीड ते दोन महिन्यांचा कालावधी काम करण्यासाठी मिळणार आहे. या अल्पकाळात अनेक कामे मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे हार-तुरे स्वीकारत सत्कार-समारंभात वेळ न घालविता खोळंबलेली कामे मार्गी लावा, असे आवाहन शहराच्या होणाऱ्या नूतन महापौर वैशाली डकरे यांना केले असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कोणत्याही परिस्थितीत पदांची खांडोळी केली जाणार नाही. यापूर्वी महापालिकेचे नेतृत्व करणाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये अवघ्या दीड-दीड महिन्याने महापौर करून संपूर्ण देशात हसे करून घेतले, ही चूक आम्ही करणार नाही, असे निवडणुकीच्या प्रचारात सांगत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. मात्र, पक्षीय राजकारण व सत्तेच्या लाभाचे पद देऊन कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी महापौर पदासह सर्वच पदांची कॉँग्रेस व राष्ट्रवादीने खांडोळी के ली. अंतर्गत कुरघोडींमुळे सभागृहाच्या शेवटच्या टप्प्यात दहा ते अकरा महिन्यांसाठी कॉँग्रेसच्या पर्यायाने सतेज पाटील यांच्या गटाच्या वाट्याला येणारे महापौरपद अवघ्या पाच महिन्यांवर आले. या पाच महिन्यांतील दीड ते दोन महिनेच महापौरांना पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळणार आहे. या अल्पकाळात हार-तुरे व सत्कार-समारंभ करण्यात नूतन महापौरांनी वेळ दवडू नये. दि. ४ व ५ जुलै या दोन दिवशीच खास सत्कार स्वीकारून नंतर बंद करावा, अशी सूचना सतेज पाटील यांनी डकरे यांना केली आहे. (प्रतिनिधी)सर्वसाधारण सभेत पदावर शिक्कामोर्तबवैशाली डकरे यांच्या महापौर निवडीवर शनिवारी (दि. ४) विशेष सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. सकाळी ११ वाजता निवड जाहीर होणार आहे. यानंतर त्याच दिवशी दुपारी चार वाजता नूतन महापौरांनी शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा, या पाठपुराव्यासाठी तयारीच्या अनुषंगाने महापालिकेत बैठकीचे आयोजन केले आहे.