शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांत टक्केवारी पाहू नका

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

विजय शिवतारे : नृसिंहवाडीत कन्यागत महापर्व काळाच्या विकासकामांना प्रारंभ

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाळासाठी होणारी विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदार यांनी योग्य खबरदारी घ्यावी, यात टक्केवारी पाहू नये, असा मार्मिक सल्ला राज्याचे जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नृसिंहवाडी येथे दिला. नृसिंहवाडीसह पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी १२१ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शासनाचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार उल्हास पाटील, जि. प.च्या अध्यक्षा विमल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शक्ती आणि भक्तीने नटलेला कोल्हापूर जिल्हा आणि या जिल्ह्याचे ऊर्जास्रोत असेलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी, सातशे वर्षांची धार्मिक परंपरा, श्रद्धेची अनेकांना आलेली प्रचिती यांचा विचार करून बारा वर्षांनी येणाऱ्या कन्यागतसाठी हा भरघोस निधी राज्य शासनाने दिला आहे. नाशिक येथील कुंभमेळ्याच्या धर्तीवर येथील नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हा सोहळा सर्वांच्या सहकार्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आमचे शासन हे छत्रपती शिवाजी व शाहू यांच्या विचाराप्रमाणे रयतेचे शासन आहे. त्यांच्या काळात रयतेला कोणत्याही प्रश्नासाठी आंदोलन करावे लागत नव्हते; कारण जनतेचे प्रश्न राजांना माहीत होते. त्याचप्रमाणे आमचे शासन काम करीत आहे. कन्यागतसाठी आम्ही भरघोस निधी दिला, हे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही शासनाचा सत्कार केला, या तुमच्या भावना मुख्यमंत्रीसाहेबांपर्यंत निश्चित पोहोचवू. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी भरघोस निधीबद्दल मुख्यमंत्री व शासनाचे विशेष आभार मानले. सरपंच अरुंधती जगदाळे यांनी स्वागत केले. उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. या समारंभास जि. प.च्या बांधकाम सभापती सीमा पाटील, पं. स. शिरोळच्या सभापती सुवर्णा अपराज, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष वैभव उगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.