शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्डची मतदार ओळखपत्राशी ‘लिंक’ लागेना

By admin | Updated: May 20, 2015 00:13 IST

शिबिराला अल्प प्रतिसाद : लिंकिंगसाठी आॅनलाईन किंवा पुढील शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन

इचलकरंजी : मतदान ओळखपत्राला आधारकार्ड जोडणी (लिंकिंग) करण्यासाठी रविवारी झालेल्या शिबिरात हातकणंगले, इचलकरंजी व शिरोळ परिसरातील २१ हजार जणांनी जोडणी केली. जोडणीला मिळणारा प्रतिसाद अल्प प्रमाणात असून, २१ जून व १२ जुलैला होणाऱ्या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी जोडणी करून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी पत्रकार बैठकीत केले.पहिल्यांदा घेण्यात आलेले शिबिर व आॅनलाईन पद्धतीने झालेल्या जोडण्या यामध्ये हातकणंगले २७८-विधानसभा मतदारसंघातील तीन लाख चार हजार ८८६ मतदारांपैकी ७,२१९ जणांनी जोडणी केली होती. रविवारी झालेल्या शिबिरात ७,३९५ नागरिकांनी जोडणी केली. त्यामुळे आता १४,६०० नागरिकांची जोडणी पूर्ण झाली आहे. इचलकरंजी २७९ - विधानसभा मतदारसंघातील दोन लाख ७१ हजार ७७ मतदारांपैकी ४,९२२ नागरिकांनी जोडणी केली होती. रविवारच्या शिबिरात १,९३३ जणांनी जोडणी केली. एकूण ६,८५५ नागरिकांची जोडणी झाली आहे. तर शिरोळ २८०-विधानसभा मतदारसंघातील दोन लाख ९१ हजार ८४ मतदारांपैकी १८,१६६ नागरिकांनी जोडणी केली होती. रविवारच्या शिबिरात ११,७३० जणांनी जोडणी केली. त्यामुळे एकूण २९,८९६ नागरिकांनी जोडणी केली आहे.जोडणीसाठी मिळणारा हा प्रतिसाद अल्प असून, येणाऱ्या शिबिरात अथवा आॅनलाईन पद्धतीने लवकरात लवकर जोडणी करून मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले. यावेळी हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)यादी अपडेट होणार... मतदान ओळखपत्र व आधारकार्ड यांची जोडणी केल्यानंतर डबल झालेले मतदान ओळखपत्र रद्द होतील. तसेच मतदारांची यादी अपडेट होईल. यामुळे मतदान प्रक्रियेतही सुलभता येईल, या हेतूने शासनामार्फत जोडणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.