शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांकडून कानपिचक्या

By admin | Updated: July 3, 2017 00:50 IST

अजितदादांकडून कानपिचक्या

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महिन्याभरात पक्षाची जिल्ह्णासह तालुकानिहाय कार्यकारिणी झाली पाहिजे... चांगली कामगिरी न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घरी बसवणार... पक्षात कुणाचीही मक्तेदारी नाही, हे लक्षात घ्या... गटातटांचे राजकारण न करता पक्षविस्ताराचे काम करा... पदाचा वापर स्वत:च्या हिस्सेदारीसाठी करू नका... आमदाराचा पुतण्या, पुढाऱ्यांचा मुलगा म्हणून संघटनेत पदे देऊ नका... अशा कानपिचक्या देत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचे दोन खासदार व दहा आमदार निवडून आले पाहिजेत, यासाठी तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथील छत्रपती शाहू सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश युवक उपाध्यक्ष, शहर युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अजितदादा पवार यांनी आढावा घेतला. यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, शहराध्यक्षा जहिदा मुजावर, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदिल फरास, शहर युवक अध्यक्ष अमोल माने, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अवधूत अपराध यांच्यासह तालुकाध्यक्षांनी आपल्या पक्षसंघटनेतील कामांची माहिती दिली. काही ठिकाणी कार्यकारिणी अपूर्ण आहे, काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड झालेली नाही; तसेच पक्षांतर्गत गटबाजीही यावेळी समोर आल्याने अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत कानपिचक्या दिल्या.संघटनेत पदे देताना पक्षाच्या आमदाराचा पुतण्या, पुढाऱ्याचा मुलगा घेऊन जागा अडवू नका. त्यांच्यात योग्यता व पात्रता असेल तर विचार होऊ शकतो. अजितदादा पवार म्हणाले, येणाऱ्या काळात जिल्ह्णात दोन खासदार व दहा आमदार हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच निवडून आले पाहिजेत. कुठल्या पक्षाशी आघाडी होईल हे न पाहता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सुनील तटकरे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या कामाच्या मार्केटिंगमध्ये आपण कमी पडलो. सध्याचे राज्यकर्ते हे फक्त घोषणाच करीत असून त्याची अंमलबजावणी करीत नाहीत.गटबाजी उघडबैठकीत मुश्रीफ व महाडिक यांच्यातील गटबाजी दिसून आली. कार्यकर्त्यांच्या भाषणातून हे दिसून आले. यावर अजितदादा व सुनील तटकरे यांनी गटबाजीमध्ये न अडकता पक्षविस्तार महत्त्वाचा असल्याचे सांगितले.शाखांच्या फलकांवर स्वत:चे फोटो लावू नकागावागावांत पक्षशाखा काढून फलक लावा. या फलकांवर स्वत:चे फोटो लावण्यापेक्षा पक्षाध्यक्षांचा फोटो लावा. तरीही त्यांच्यापेक्षा तुम्हाला तुमचाच फोटो महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्हालाच राष्ट्रीय अध्यक्ष करतो, असे अजितदादांनी म्हणताच हास्याचे फवारे उडाले.जिल्ह्यातील नेत्यांचे आमच्याकडे जास्तच लक्ष आहेजिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने यांनी जिल्ह्णातील नेत्यांचे आमच्याकडे जरा जास्तच लक्ष असल्याने कागलमध्ये घरकुलाबाबत मोर्चे काढून आमदार मुश्रीफांसह आम्हाला राजकारणातून संपविण्याची भाषा केली जात आहे. यावर आम्ही प्रतिमोर्चा काढून लढाई सुरू ठेवल्याचे सांगितले. यावर हल्ले हे शक्तिस्थळांवरच होत असतात. देशपातळीवर शरद पवार यांच्यावरही असे हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे आपण ते परतवून लावले पाहिजेत, असे अजितदादांनी सांगितले.धनंजय महाडिक हीच राष्ट्रवादीची ‘दक्षिणे’तील ताकद राष्ट्रवादीचे ‘कोल्हापूर दक्षिण’चे अध्यक्ष नितीन पाटील यांनी कोेल्हापूर दक्षिण मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक व माजी मंत्री आमदार सतेज पाटील अशा दोन ताकदी असून, या ठिकाणी आपण राष्ट्रवादीचे चांगल्या प्रकारे काम केल्याचे सांगितले. हा धागा पकडत सुनील तटकरे यांनी धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने त्यांची ताकद ही राष्ट्रवादीचीच असून, यामध्ये दुमत असण्याचे कारण नसल्याचे निदर्शनास आणून दिले.व्यासपीठावर खा. महाडिक आहेत, हे लक्षात घ्याराष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष आदिल फरास यांनी आपल्या भाषणावेळी व्यासपीठावरील सर्व नेत्यांची नावे घेतली. यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचे नाव घ्यायला ते विसरले. यावर अजितदादांनी ‘व्यासपीठावर खासदार महाडिक आहेत, हे लक्षात असू द्या,’ अशी चूक फरास यांच्या लक्षात आणून देत ठणकावले.