शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

टी.व्ही.तील स्त्रियांचे अंधानुकरण नका

By admin | Updated: January 23, 2015 00:36 IST

स्मिता कोल्हे : डी. बी. पाटील वाचन मंडळाचे उद्घाटने

कोल्हापूर : स्त्री ही आदिमाता असून, सृष्टीची विकासक आहे. स्त्रियांच्या अंगभूत क्षमतेमुळे ती प्रस्थापित व्यवस्थेमध्ये टिकून राहिली आहे. तिच्यामध्ये समाजव्यवस्था बदलण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी येथे केले. स्त्रियांनी केवळ टी.व्ही.मध्ये दिसणाऱ्या महिलांचे अंधानुकरण करीत स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या न्यू कॉलेज येथे ‘ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील वाचन मंडळ’ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. रवींद्र कोल्हे प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या, जे आपल्याला दिसत नाही, ते चांगले की वाईट हे आपल्याला ठरविता येत नाही. त्या गोष्टी करून स्त्री स्वत:ला संकटात टाकत आहे. या क्षणिक, क्षुल्लक गोष्टींच्या प्रभावाने आजच्या मुली स्वत:चे सामर्थ्य ओळखू शकत नाहीत, ही शोकांतिका वाचनाने दूर करता येईल.डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, मेळघाटातील आदिवासी हे तथाकथित प्रगत जागतिकांपेक्षा जास्त संस्कारित असून, मूल्यांची जोपासना ते स्वभावत:च करतात. प्रगत समाजातील स्वार्थ, लबाडी, स्त्रीला भोगवस्तू मानणे या दुर्गुणांपासून ते अलिप्त आहेत. निसर्गाचा सन्मान राखून ते स्वत:च्या गरजा भागवितात. स्त्री-पुरुष असा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक केला जात नाही. आदिवासी कोरकू समाजामध्ये स्त्री-जन्माचा उत्सव साजरा केला जातो. स्त्री-धन हे तिचेच असते. नवरा किंवा कोणीही ते हिरावून घेऊ शकत नाही.प्रा. विनय पाटील म्हणाले, वाचनसंस्कृती जोपासून ती वाढविणे ही आजची गरज बनली आहे. हायस्कूल व कॉलेजमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचन मंडळे उपयोगी ठरतात.वाचनकट्ट्याचे सदस्य युवराज कदम यांनी वाचन मंडळ चालविण्यासंदर्भात मौलिक सूचना दिल्या. डॉ. एन. व्ही. नलवडे यांनी ‘बुके नको, बुक द्या’ ही ‘प्रत्येक घरी एक पुस्तक दर महिना’ योजना राबविल्यामुळे वाचन चळवळीला बळ प्राप्त झाल्याचे सांगितले. यावेळी प्रा. विलास रणसुभे, डॉ. शशिकांत चौधरी, रमेश राशिवडेकर, लेखक डॉ. मधुकर निरांजे, डॉ. अरुंधती पवार, प्रा. आर. एस. किरूळकर, प्रा. पी. व्ही. डोणे, प्रा. व्ही. डी. किल्लेदार, आदी उपस्थित होते. प्रा. टी. के. सरगर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. यु के. गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर उपप्राचार्य प्रा. यु. पी. शेवाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)