शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

विसर न व्हावा... त्यांचा विसर न व्हावा...

By admin | Updated: January 19, 2017 00:47 IST

शिवाजी चौक सुशोभीकरण : विल्सनचा पुतळा फोडणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची नावे कोरण्याच्या आश्वासनाची पूर्ती करावी

कोल्हापुरातील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हे करत असताना विल्सनचा पुतळा फोडणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची नावे तेथे असावीत. ती विस्मृतीत जाऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करणारे करवीर तालुक्यातील सांगवडेवाडीच्या जयंत व्यंकटेश देशपांडे यांनी ‘लोकमत’ला पाठविलेले हे पत्र...! ‘लोकमत’च्या हॅलो कोल्हापूरमध्ये गेल्या २४ डिसेंबर रोजी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. ‘ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार - छत्रपती शिवाजी चौकाचे सुशोभीकरण’ अशी ती बातमी होती. या चौकामध्ये अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. पण एक पथदर्शी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ऐतिहासिक प्रसंग विस्मरणात जातो आहे. त्यासाठी हा पत्रप्रपंच मी करतो आहे. त्याचा आपण सर्वांनी विचार करावा, ही नम्र विनंती आहे. ॅकोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फरास, उपमहापौर अर्जुन माने, आदींना ही खास विनंती आहे. या सर्वांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सध्याच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागी पूर्वी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड विल्सन यांचा पुतळा होता. १९४३ साली स्वातंत्र्यलढा तीव्र झाला होता. त्यामुळे गव्हर्नर विल्सन यांच्या पुतळ्याला रात्रंदिवस बंदूकधारी पोलिसांचा पहारा होता. थोर स्वातंत्र्यसेनानी कै. शंकरराव माने (कोल्हापूर), व्यंकटेश वा. देशपांडे (सांगवडेवाडी), माजी आमदार काका देसाई, कुंडल देसाई (म्हसवे), शामराव पाटील, नारायण घोरपडे (वडणगे) या सहा तरुणांनी पुतळा साफसफाई करण्याचा बहाणा करून पहाटे पाचच्या सुमारास गव्हर्नर विल्सनचा पुतळा घणाचे घाव घालून फोडला आणि सहा दिशांनी हे सहा तरुण पळून गेले. या सर्वांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पकड वॉरंट जारी केले आणि पकडून देणाऱ्यांसाठी पाचशे रुपयांचे (त्यावेळचे) बक्षीसही जाहीर केले. स्वातंत्र्यप्रेमाने भारलेल्या या सहा स्वातंत्र्यवीरांनी या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर असे लिहिले होते की, ‘या चबुतऱ्यावर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचाच पुतळा उभा करावा; अन्य कोणाचा दुसरा पुतळा उभा केल्यास तो टिकू देणार नाही.’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या प्रेरणेने भारावलेल्या या स्वातंत्र्यवीरांचा इंग्रजी सत्तेशी लढा चालू होता. त्यांच्या आणि कोल्हापुरातील जनतेच्या मनातील भावना जाणून घेऊन शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच चबुतऱ्यावर उभा केला, तो सुदिन होता १३ मे १९४५. गव्हर्नर विल्सन यांचा पुतळा या स्वातंत्र्यवीरांनी १३ सप्टेंबर १९४३ रोजी फोडला होता. या ऐतिहासिक प्रसंगाचा सुवर्णमहोत्सव १९९३ मध्ये झाला. त्यानिमित्त तत्कालीन महापौर भिकशेठ पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर महापालिकेच्यावतीने या स्वातंत्र्यवीरांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी या सहा स्वातंत्र्यवीरांची नावे ‘स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार’ म्हणून त्या चबुतऱ्याखाली कोरण्याचे जाहीरपणे सांगितले होते. पण त्या गोष्टीची अद्याप पूर्तता झालेली नाही. सध्या या पुतळ्याच्या चौकाचे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यावेळी त्या स्वातंत्र्यवीरांची नावे याच चौकात एक मानस्तंभ उभा करून त्यावर कोरली जावीत, अशी अपेक्षा आहे आणि ही जागा कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला स्फूर्ती देणारी सदैव रहावी, अशी अपेक्षा आहे. यासाठी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ तसेच महापौर, उपमहापौर आणि महापालिकेने तळमळीने प्रयत्न केल्यास हे काम सहज होऊन जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्रयत्न केले, त्यासाठी पाया निर्माण केला त्यांची नावे चिरस्मरणीय ठरावीत, नव्या पिढीसाठी उजेडात यावीत एवढीच अपेक्षा आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहिलेले आणि स्वातंत्र्यलढ्यात महान कार्य केलेल्या या महनीय व्यक्तींना न्याय देण्याचे काम सुशोभीकरण समितीने करावे, ही नम्र विनंती.