शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

जिल्ह्याचा स्वाभिमान दुसऱ्याच्या दावणीला बांधू नका!

By admin | Updated: April 22, 2015 00:25 IST

उदयनराजे गरजले : रामराजेेंच्या ‘बंद लखोटा’ परंपरेवर केली जहाल टीका

सातारा : सातारा जिल्ह्यातील मातीत प्रचंड ऊर्जा आहे. येथील जनता लोकप्रतिनिधींना आपल्या स्वाभिमानासाठी निवडून देते. आपला स्वाभिमान दुसऱ्या जिल्ह्याच्या दावणीला बांधण्यासाठी नाही, अशी जहाल टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी केली. जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण व इतर मतदारसंघातील मतदारांची बैठक सायंकाळी उशीरा घेतली होती. या बैठकीत ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, ‘दुसऱ्याला बाजूला सारुन राजकारण करण्याची परंपरा अनेक दिवसांपासून रुढ होत चालली आहे. मला जिल्हा बँकेत निवडून जाऊन कोणताही लाभ घ्यायचा नाही. मला कर्ज काढण्याची गरज नाही. पण जिल्ह्याचा स्वाभिमान जपण्यासाठी मला हे करावे लागत आहे. या प्रस्थापित मंडळींवर ‘चेक’ बसण्यासाठी जो उमेदवार योग्य असेल त्याला माझा पाठिंबा राहिल. लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा हक्क आहे. त्यामुळे नव्या मंडळींना संधी द्यावी, अशी माझी भूमिका सुरुवातीपासूनच राहिली आहे. मात्र, ‘त्यांना’ ती मान्य नाही. त्यामुळेच माझ्याविषयी त्यांना राग आहे.’गेल्या पाच वर्षांतील त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी त्यांना भीती होती, म्हणूनच बंद लखोट्यातून आलेले निर्णय माजी पालकमंत्री सांगत होते. हे बंद लखोट्यात काय लिहिलंय, हे मला दाखवा, असा माझा आग्रह होता. मात्र, त्यांना तो त्यांना मान्य नव्हता. या सर्वांना मान्य होतं की मी मनमानी कारभार चालू देणार नाही. त्यामुळेच मला जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीत घेतलं गेलं नाही. भांडल्याशिवाय काहीच मिळणार नाही, हे मला माहित झालं आहे. त्यामुळे रेल्वेचे दोन ट्रॅकसाठी साडेचार कोटी मंजूर करुन आणले. कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गासाठीही मी पाठपुरावा केला आहे. वर्षानुवर्षे खुर्चीला चिकटून बसणाऱ्यांनी काय केले आहे, असा सवालही उदयनराजेंनी यावेळी उपस्थित केला. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रवी साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, अ‍ॅड. डी. जी. बनकर, सुनील काटकर, संभाजीराव पाटणे, पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत पडवळ, नाना शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मीच माझा पीए, ड्रायव्हर, क्लिनर..माझ्या आणि जनतेच्या मध्ये कोणी नाही. मीच माझा पीए, ड्रायव्हर आणि क्लिनरही आहे. त्यामुळे जे काही प्रश्न आहेत. ते न डगमगता माझ्यापर्यंत पोहचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. दबाव आणणाऱ्याचा योग्य ‘मान-पान’माझे नाव घेऊन सामान्य जनतेला वेठीस घेण्याचा प्रकार कोण करत असेल तर ते खपवून घेणार नाही. मला भ्रष्टाचार बिलकूल खपत नाही. कोणी दबाव आणत असेल तर त्याचा योग्य मान, पान, सन्मान करुन त्याचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासनही उदयनराजेंनी उपस्थितांना दिले.