शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चांगले काम करा, विकासनिधी देऊ

By admin | Updated: January 1, 2017 00:53 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : विमानतळावर स्वागतासाठी गर्दी

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नगरपालिकांमधील विकासकामांसाठी निधी देऊ, चांगले काम करा, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जिल्ह्यातील भाजप, ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्षांना दिले.मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले होेते. सायंकाळी धावपट्टीवर हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री काही वेळातच विमानाने जाणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील भाजपसह मित्र पक्षाचे नगराध्यक्ष, भाजपचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आत प्रवेश देण्यासाठी पास देण्यात आले होते.सायंकाळी ६.४५ वाजता मुख्यमंत्र्यांचे शिरोळ येथून हेलिकॉप्टरने विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, आदी मान्यवर होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भाजपचे नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना शुभेच्छा देऊन नगरपालिकांमध्ये विकासकामांसाठी निधी देऊ, पण चांगले काम करा, असे सांगितले. यानंतर ६.५० वाजता मुख्यमंत्र्यांचे विमानाने मुंबईकडे प्रयाण झाले.यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, महेश जाधव, राहुल चिकोडे, के. एस. चौगुले, रिपाइं (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, जयसिंपूरच्या नगराध्यक्ष नीता माने, गडहिंग्लजच्या स्वाती कोरी, पन्हाळ्याच्या रूपाली धडेल, वडगावचे नगराध्यक्ष मोहन माळी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)