शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत विभागनिहाय ‘बायोमेट्रिक’

By admin | Updated: December 26, 2014 00:05 IST

लेटकमर्सना चाप : नियंत्रण ठेवणे झाले सोपे, १२ विभागांसाठी प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : जिल्हा परिषदेने सर्व १२ विभागांत स्वतंत्र बायोमेट्रिक यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी लेटकमर्सना महिन्यापूर्वी दणका दिला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेळेवर कटाक्षाने नजर ठेवली आहे. आता विभागांत बोयोमेट्रिक यंत्र बसवून लेटकमर्सना चाप बसविणार आहे. महिन्यापूर्वी उपाध्यक्ष खोत यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून लेटकमर्सना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर लेटकमर्सचा मुद्दा ऐरणीवर आला. सामान्य प्रशासनही लेटकमर्सना चाप लावण्यासंबंधी गांभीर्याने विचार करू लागले. यातूनच स्थायी समितीच्या सभेत नुकतेच प्रत्येक विभागाला स्वतंत्र बायोमेट्रिक यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने कार्यालयात तळमजल्यावर दोन आणि प्रत्येक मजल्यावर एक, अशी पाच बायोमेट्रिक यंत्रे बसवली. यंत्रांवर सामान्य प्रशासन नियंत्रण ठेवते. कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आणि यंत्रे कमी असल्यामुळे नियंत्रण ठेवताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे विभागप्रमुख ‘मॅन्युअल’ हजेरी पद्धत ठेवतात. त्यामुळे विभागप्रमुखाच्या मर्जीतला कर्मचारी उशिरा आला तरी ‘उशिरा शेरा’ पडत नव्हता. याचा परिणाम म्हणून विभागप्रमुखाला मॅनेज केले की, कार्यालयात कधीही आले तरी चालते, अशी मानसिकता वाढू लागली. तसेच बढती, बदलीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची नावे बायोमेट्रिक यंत्रातून वेळच्यावेळी कमी होत नव्हती. तर सर्व विभागांत एकूण कर्मचारी किती, याबद्दल नेमकेपणा नव्हता. यासाठी सामान्य प्रशासन, बांधकाम, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, अर्थ, आरोग्य, पशुसंवर्धन, शेती, अशा १२ विभागांत बायोमेट्रिक यंत्रे बसवणार आहेत. यामुळे कोणता कर्मचारी ‘थंब’करतो, कोण करीत नाही, हे निदर्शनास येणार आहे. बढती, बदली होऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांची नावे त्या-त्यावेळी कमी करता येणार आहेत. दहा महिला कर्मचाऱ्यांसाठी 'मॅन्युअल हजेरी'बायोमेट्रिक पध्दतीमुळे जिल्हा परिषदेत एकूण ५५३ कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दहा महिला कर्मचाऱ्यांच्या दोन्ही हातांच्या बोटांच्या रेषा अस्पष्ट आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक यंत्रावर त्यांची हजेरी नोंदविली जात नाही. त्यामुळे त्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘मॅन्युअल’ हजेरी ठेवावी लागणार आहे. प्रत्येक विभागाला बायोमेट्रिक बसविल्यामुळे लेटकमर्सना चाप बसणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत सर्व विभागांत स्वतंत्र यंत्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक निधी घ्या, अशी सूचनाही केली आहे. - शशिकांत खोत, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद