ग्रामीण भागातील महिलांची शेती , जळण , गोळा करण्यास एकच धांदल उडाली . काजू , आंबा , या फळासह वांगी , टोमॅटो , मिरची , कोबी , कोथंबिर , भेंडी , आदी भाजीपाल्याचे नुकसान झाले . वादळी वाऱ्यामुळे करवंदे , जांभूळ , काजू , रातांबी , नेर्ली आदी रानमेव्याचे वाऱ्याने नुकसान झाले. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले होते. वळवाने लावलेल्या हजेरी मुळे शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय झाले होते. हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता . आकाशात विजेचा कडकडाट एक तास सुरु होता . वळवाचा पावसामुळे ऊस , मका , सुर्यफूल या पिकांना पाऊस पोषक ठरला .
शाहूवाडी तालुक्यात वळवाचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST