शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘जिल्हा नियोजन’ बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नगरपालिका मतदारसंघातून १६ उमेदवारांनी १७ अर्ज आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून दोन उमेदवारांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला या समितीत सर्वाधिक म्हणजे ४० पैकी १३ जागांवर संधी मिळाली आहे; तर त्याखालोखाल कॉँग्रेसला १० जागा मिळाल्या ...

ठळक मुद्देकॉँग्रेसला १० जागा
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नगरपालिका मतदारसंघातून १६ उमेदवारांनी १७ अर्ज आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून दोन उमेदवारांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला या समितीत सर्वाधिक म्हणजे ४० पैकी १३ जागांवर संधी मिळाली आहे; तर त्याखालोखाल कॉँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या सात उमेदवारांना संधी मिळाली आहे. नगरपालिका मतदारसंघातील पाच जागांसाठी २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघापुरती निवडणूक लागण्याची चिन्हे होती; परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये सामंजस्याने याबाबत चर्चा होऊन माघार घेतली गेल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली. ढोबळमानाने ४० जागांपैकी भाजप आणि मित्रपक्षांना २१ जागा, तर दोन्ही कॉँग्रेससह पाठिंबा देणाºया शिवसेनेच्या सदस्यांना १९ जागा देण्याचा निर्णय याआधीच झाला होता. त्यानुसार ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील, राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांनी काम पाहिले.जिल्हा परिषद मतदारसंघातीलनूतन सदस्यअरुण इंगवले, विजया पाटील, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, अशोक माने, प्रा. अनिता चौगुले, कल्पना चौगुले, महेश चौगले, मनीषा टोणपे, स्मिता शेंडुरे (भाजप), स्वाती सासने, प्रवीण यादव, आकांक्षा पाटील, वंदना जाधव (शिवसेना), पांडुरंग भांदिगरे, राहुल पाटील, भगवान पाटील, बंडा माने, वंदना पाटील, शिल्पा पाटील (कॉँग्रेस), विजय बोरगे, प्रियांका पाटील, जीवन पाटील, मनोज फराकटे, सविता भाटळे (राष्ट्रवादी), शिवाजी मोरे (जनसुराज्य), राहुल आवाडे (जिल्हा ताराराणी आघाडी), सुनीता रेडेकर (ताराराणी आघाडी), रसिका पाटील (अपक्ष), विद्या पाटील (युवक क्रांती आघाडी).महापालिका मतदारसंघातीलनूतन सदस्यसुनील पाटील (राष्ट्रवादी), माधुरी लाड, दीपा मगदूम (कॉँग्रेस), भूपाल शेटे (कॉँग्रेस)विजय सूर्यवंशी (भाजप), रूपाराणी निकम (ताराराणी आघाडी).नगरपालिका : नूतन सदस्य अलका स्वामी- इचलकरंजी, प्रवीण प्रभावळकर- मलकापूर (भाजप), हारुण सय्यद- गडहिंग्लज (राष्ट्रवादी), यास्मिन मुजावर - पन्हाळा (जनसुराज्य), तेजश्री भोसले- इचलकरंजी (कॉँग्रेस).‘लोकमत’ने २२ मे रोजी वर्तवला ‘बिनविरोध’चा अंदाज‘लोकमत’ने निवडणुकीच्या आधी तब्बल दोन महिने आधी ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. नगरपालिका गटात अधिक अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक लागण्याची चिन्हे होती. मात्र इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने ‘लोकमत’ने दिलेल्या दोन महिन्यांपूर्वीच्या वृत्तावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.