शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

जि. प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:28 IST

आजरा : सव्वा वर्षाचा कालखंड संपल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना आमच्याबरोबर आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढची व्यूहरचना आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.आजरा येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील आप्पासाहेब कल्लाप्पा पाटील, पत्नी महानंद व नूतन नगरसेवक, सरपंच, सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ...

आजरा : सव्वा वर्षाचा कालखंड संपल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना आमच्याबरोबर आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढची व्यूहरचना आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.आजरा येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील आप्पासाहेब कल्लाप्पा पाटील, पत्नी महानंद व नूतन नगरसेवक, सरपंच, सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते.पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात पेट्रोल ९० रुपयांपर्यंत गेले. घरगुती गॅसचा दर वाढला. समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. शेतकरी अडचणीत आहे. त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होत नसल्याने तरुणाई हवालदिल आहे.आजरा नगरपंचायत जिंकल्यामुळे सत्ताधाऱ्यांना जग जिंकल्यासारखे वाटते. लोकसभा निवडणुकीत १४ पैकी ११ ठिकाणी भाजपचा पराभव झाला. काँगे्रसच्या काळात पोलीस पाटलांचे मानधन ८०० रुपयांवरून ३००० केले. एक वर्षानंतर आजरा शहराच्या विकासासाठी निधी देणार आहे.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, विस्थापितांच्या पुनर्वसनानंतर सुंदर वसाहत करण्याचे काम आप्पासाहेब पाटील यांनी केले. जातीयवादी शक्ती प्रबळ होत असल्याने पुरोगाम्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.यावेळी माजी उपसरपंच अशोक पोवार, पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक भगवान पाटील, आप्पासाहेब पाटील, सभापती रचना होलम यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेवक, सरपंच, सदस्य यांचा सत्कार झाला.याप्रसंगी जि. प. सदस्य जयवंत शिंपी, मुकुंद देसाई, विद्याधर गुरबे, राजू होलम, रवींद्र भाटले, बशीर खेडेकर, उदयराज पोवार, भैया कोंडके, भिकाजी गुरव, सीमा पोवार, आदी उपस्थित होते.धर्मांध शक्तीला विरोधदेशात धर्मांध शक्ती वाढत आहे. अशा काळात आमच्या विचाराच्या नऊ ग्रामपंचायतींत सत्ता आली आहे. परिवर्तन होत असल्याने एकत्र येण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी सांगितले.एकदा चुकलो, पुन्हा नाहीबारामतीकराचं बंटीसाहेब ऐकतात असे वक्तव्य के. पी. पाटील यांनी केले. या वक्तव्याचा धागा पकडत बारामतीकरांचं एकदा ऐकून चूक केली, पुन्हा बारामतीकरांचं ऐकणार नसल्याचे आमदार सतेज पाटील म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.