शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. सभेत हद्दवाढीला विरोध

By admin | Updated: March 15, 2016 01:01 IST

हद्दवाढ प्रश्न : लक्ष वेधले; ‘गावे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’ घोषणा

कोल्हापूर : ‘गावे आमच्या मालकीची, नाही कोणाच्या बापाची’ अशी घोषणा देत जिल्हा परिषदेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावित हद्दवाढीला विरोध झाला. विरोधाचे घोषवाक्य लिहिलेली टोपी घालून बाजीराव पाटील, विलास पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. हद्दवाढीला विरोध करताना बाजीराव पाटील म्हणाले, महापालिकेने हद्दवाढीचा ठराव करून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. प्रस्तावित हद्दवाढ झाल्यास १८ गावांचा समावेश होणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. ग्रामीण भागातील लोकांची शहरात येण्याची मानसिकता नाही. शहरात आल्यानंतर शेती, उद्योग उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे सभागृहाने हद्दवाढीला विरोध करावा. अरुण इंगवले यांनी सन १९७२ मध्ये झालेल्या तलावांच्या मालकीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, तलाव संबंधित शेतकऱ्यांच्या नावे आहेत. यापूर्वी मी सातत्याने जिल्ह्यातील सर्व तलावांचा सर्व्हे करा, सात-बारावर जिल्हा परिषदेची नावे लावा, अशी मागणी केली; परंतु, अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम केले आहे. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पूर्ण खुलासा ऐकून न घेताच इंगवले यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू ठेवला. जिल्हा परिषदेच्या अनेक मालमत्ता दुसऱ्यांच्या नावे आहेत, त्यांचा कधीतरी विचार करा, असा सल्लाही इंगवले यांनी दिला. (हॅलो ८ वर)एम्पती फौंडेशनचा सत्कार..जिल्ह्यातील शाळा इमारत बांधकाम करण्यासाठी एम्पती फौंडेशनने ७ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत. त्याबद्दल ‘एम्पती’चे अध्यक्ष व आयएसओ मानांकन मिळविलेल्या प्राथमिक शाळांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. टोपी काँग्रेसची...हद्दवाढ विरोधाचे घोषवाक्य लिहिलेली पांढरी टोपी परिधान करून शिवसेनेचे सदस्य बाजीराव बोलत होते. त्यावेळी राजेंद्र परीट यांनी बाजीराव यांच्याकडे पाहत डोक्यावर ‘काँग्रेसची टोपी’ आहे, असा टोला लगावताच सभागृहात एकच हशा पिकला.