शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. निवडणुकीचा बिगुल वाजला

By admin | Updated: January 4, 2017 00:25 IST

मतदार यादी २१ ला प्रसिद्ध : १२ ते १७ जानेवारी हरकतीची मुदत

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. एक जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांक धरून तयार करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक ५ जानेवारी २०१७ असून विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींकरिता तयार केलेली मतदार यादी १२ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवसापासून १७ जानेवारीच्या संध्याकाळी साडेपाचपर्यंत हरकती घेता येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या ‘कलम १३’ खाली छापील मतदार याद्या माहितीसाठी २१ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांक धरून विधानसभा मतदार यादीचे विभाजन १६ सप्टेंबर २०१६ ला भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली प्रारूप मतदार यादी व १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर १६ सप्टेंबरनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन भारत निवडणूक आयोगातर्फे प्रसिद्ध होणारी ५ जानेवारी २०१७ ची पुरवणी यादी असेल. या पुरवणी यादीचे प्रभागनिहाय विभाजन ७ जानेवारी २०१७ पर्यंत केले जाईल. जिल्ह्यातील विधानसभा मतदार यादीत स्थानिक स्वराज्य संस्थेत समाविष्ट असलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान ठेवली जाणार आहे. (प्रतिनिधी)असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम१ जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांक विधानसभेची जी मतदार यादी तयार करण्यात आली आहे ती वापरली जाणार.पुरवणी यादीचा समावेश असलेली यादी तयार करण्यात येईल१२ जानेवारीला तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी या मतदार याद्या पाहण्यास मिळतील.१७ जानेवारीच्या संध्याकाळी साडेपाचपर्यंत यादीवर हरकती घेता येतील.