शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली स्थगिती लपविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:54 IST

इचलकरंजी : शहरातील मालमत्तांसाठी घरफाळ्यामध्ये झालेली वाढ कमी करण्याबाबत नगरपालिका संचालकांनी निर्णय देईपर्यंत नगरपालिकेकडील कर विभागाने घरफाळ्याची बिले वितरित करू नयेत, अशा आशयाच्या ठरावाला जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिली. या पत्राची प्रत नगराध्यक्षांना मिळूनसुद्धा त्यांनी पालिका सभागृहासमोर माहिती दिली नाही. म्हणजे घरफाळावाढीला सत्तारूढ गटाचे समर्थन आहे, अशा आशयाची टीका कॉँग्रेस व राजर्षी ...

इचलकरंजी : शहरातील मालमत्तांसाठी घरफाळ्यामध्ये झालेली वाढ कमी करण्याबाबत नगरपालिका संचालकांनी निर्णय देईपर्यंत नगरपालिकेकडील कर विभागाने घरफाळ्याची बिले वितरित करू नयेत, अशा आशयाच्या ठरावाला जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिली. या पत्राची प्रत नगराध्यक्षांना मिळूनसुद्धा त्यांनी पालिका सभागृहासमोर माहिती दिली नाही. म्हणजे घरफाळावाढीला सत्तारूढ गटाचे समर्थन आहे, अशा आशयाची टीका कॉँग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडीच्यावतीने बुधवारी केली आहे.दरम्यान, विरोधी कॉँग्रेस व शाहू आघाडीने केलेला आरोप भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी फेटाळला असून, तो राजकीय द्वेषाने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.येथील नगरपालिका हद्दीमधील मालमत्तांना लागू झालेल्या चतुर्थ कर आकारणीमधील घरफाळा वाढीसंदर्भात १८ जून रोजी विशेष सभा झाली होती. सभेमध्ये चर्चा होऊन घरफाळा वाढीसंदर्भात नगरपालिका संचालकांकडे दाद मागण्यात येईल आणि त्याचा निर्णय होईपर्यंत किंवा ३१ जुलैपर्यंत घरफाळ्याची बिले वितरित करू नयेत, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाला मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी जिल्हाधिकाºयांकडे स्थगिती मागितली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिलेले पत्र नगराध्यक्षांना २९ जून रोजी प्राप्त झाले. त्यानंतर ३० जून रोजी झालेल्या नगरपालिका सभेमध्ये स्थगिती मिळाल्याची बाब नगराध्यक्षांनी सभागृहासमोर ठेवली नाही. याचा अर्थ सत्तारूढ आघाडीला घरफाळावाढीचे समर्थन करावयाचे आहे, असा होत असून, त्याचा कॉँग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडी निषेध करीत आहे, अशी माहिती नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.विरोधकांचा आरोप राजकीय द्वेषातून : पोवारदरम्यान, सत्तारूढ आघाडीतील भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी, विरोधकांनी केलेला आरोप राजकीय द्वेषातून असून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून केला आहे, असे एका पत्रकाद्वारे म्हटले आहे. तसेच घरफाळावाढ रद्द व्हावी म्हणून नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी नगरपालिका आयुक्त तथा नगरपालिका प्रशासन संचालक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे, असेही पोवार यांनी पत्रकात नमूद केले आहे.