शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर

By admin | Updated: November 19, 2016 01:08 IST

कणेरीवाडी आरोग्य उपकेंद्र वाद : सरपंचांसह, सदस्य, ग्रामस्थांना अटक व सुटका

कोल्हापूर : आरोग्य उपकेंद्रांची निविदा का उघडली नाही. कोणतरी एकटा सांगतोय म्हणून तुम्ही गावचे काम थांबवताय काय, असा जाब विचारत कणेरीवाडीचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांना शुक्रवारी दुपारी धारेवर धरले. या सर्वांचा आक्रमकपणा पाहून अखेर शाहूपुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना अटक करून नंतर सोडण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष खोत यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.आमदार सतेज पाटील गटाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत आणि आमदार अमल महाडिक यांचे समर्थक यांच्यातील गावपातळीवरील वाद अशा पद्धतीने जिल्हा परिषदेत पोहोचला. याच विषयावरून खोत यांनी काही दिवसांपूर्वी ‘स्थायी’च्या सभेत डॉ. पाटील यांना शिवीगाळ केली होती. कणेरीवाडी येथे आरोग्य उपकेंद्रासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा काढण्यात आली परंतु आपल्याला न विचारता ही निविदा कशी काढली, अशी विचारणा करत खोत यांनी डॉ. पाटील यांना शिवीगाळ केली होती. खोत हे उपकेंद्राचे काम होऊ देत नाहीत, असा आरोप करीत दुपारी सरपंच पांडुरंग खोत, सदस्य प्रकाश खोत, पांडुरंग खोत, बाजीराव खोत, संतोष कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद खोत यांच्यासह ग्रामस्थ डॉ. पाटील यांच्या दालनामध्ये निवेदन देण्यासाठी आले. यावेळी त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही निविदा उघडली नाही, असा जाब डॉ. पाटील यांना विचारला. त्यानंतर वादावादी सुरू झाल्याने या सर्वांचा आक्रमकपणा पाहून शाहूपुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले हे डॉ. पाटील यांच्या दालनात आले. प्रशासन विभागाचा कार्यभार असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांच्यासह यावेळी चर्चा करण्यात आली. अखेर सर्वांना पोलिस गाडीत घालून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.पाटील यांची कुचंबणाजिल्हा परिषदेचे खोत हे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे अमल महाडिक यांनी मंजूर केलेले उपकेंद्र गावात होऊ द्यायची नाही, अशी त्यांची भूमिका असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. यावरून त्यांनी डॉ. पाटील यांना धारेवर धरले, तर याआधीच्या स्थायी समिती सभेत खोत यांनी याच विषयावरून पाटील यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांच्या राजकारणामध्ये डॉ. पाटील यांची कोंडी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आरोग्य उपकेंद्रांच्या निविदेवरून पदाधिकारी यांच्यात वातावरण तणावपूर्ण बनल्याने शाहूपुरी पोलिसांना पाचारण केले. यामुळे पोलिस व्हॅन जिल्हा परिषदेच्या आवारात दाखल झाली होती.