शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

जिल्ह्याला १४१ कोटींचा बोनस

By admin | Updated: November 22, 2014 00:17 IST

ऊसखरेदी कर माफी : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांना होणार फायदा

प्रकाश पाटील - कोपार्डे -राज्य शासनाने अपारंपरिक उर्जा निर्मितीचे नवीन धोरण म्हणून सप्टेंबर २००८ मध्ये जे साखर कारखाने सहवीज निर्मिती प्रकल्प राबवतील अशा साखर कारखान्यांना दहा वर्षे ऊस खरेदी करात सूट केली होती. मात्र, साखरेचे घटलेले दर व ऊस खरेदी दरात झालेली भरमसाठ वाढ यामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत आलेल्या राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना ऊसखरेदी करात सूट दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील २० कारखान्यांना १४१ कोटींचा बोनस मिळाला आहे.सध्या बाजारात साखरेच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल २५०० ते २६०० रुपयांवर पोहोचल्याने किमान एफआरपी कशी द्यावयाची या आर्थिक कोंडीत कारखानदार होते. एवढी रक्कम देण्यासाठी शासनाने प्रतिटन अनुदान द्यावे अथवा विविध करातून शासनाला द्याव्या लागणाऱ्या करातून सुटका करावी, अशी मागणी कारखानदारांकडून हंगाम सुरू झाल्यापासून होत होती.सध्या शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी संघर्षाची धार कमी केली असली तरी येत्या काळात किमान एफआरपीसाठी तरी संघटनांनी नाही लावला तरी शासन तगादा लावणार व एकरकमी एफआरपी देता येणे शक्य नसल्याने व ती न दिल्यास कारखानदारांवर कारवाईचे संकेत राज्याचे मुख्य सचिव व ऊसदर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष क्षत्रीय स्वाधीन यांनी दिल्याने कारखानदारात असंतोष होता. यासाठीच भाजप सरकारने ऊस खरेदी करात सूट देऊन कारखानदारांना दिलासा दिला आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे उपलब्ध ऊस लाख मेट्रीक टन व ऊस खरेदी करातून किती रक्कम बोनस मिळणार याची आकडेवारी (एफआरपीनुसार ऊस खरेदी धरून अंदाजे किती लाभ होणार याचा सारांश)कुंभी-कासारी (कुडित्रे)५ लाख ७८ हजार७ कोटी ५१ लाखभोगावती (परिते)६ लाख ८ हजार८ कोटी ८४ लाखशाहू (कागल)७ लाख ३३ हजार९ कोटी ३४ लाखराजाराम (बावडा)४ लाख १६ हजार४ कोटी ९९ हजारदत्त (शिरोळ)८ लाख ७५ हजार१० कोटी ९३ लाखदूधगंगा-वेदगंगा (बिद्री)७ लाख ६९ हजार१० कोटी १८ लाखगडहिंग्लज (हरळी)३ लाख ४ हजार३ कोटी ६४ लाखजवाहर (हुपरी)९ लाख ११ हजार११ कोटी ३८ लाखमंडलिक, हमीदवाडा५ लाख ३६ हजार७ कोटी १० लाखपंचगंगा (इचलकरंजी)५ लाख ८४ हजार७ कोटी ३० लाखशरद (शिरोळ)४ लाख ९२ हजार६ कोटी २७ लाखवारणा१४ लाख ९ हजार१७ कोटी ८८ लाखडी. वाय. पाटील (पळसंबे)४ लाख ६४ हजार६ कोटी ३ लाखदालमिया (आसुर्ले)४ लाख ६४ हजार६ कोटी ३ लाखगुरूदत्त (टाकळी)४ लाख ७६ हजार६ कोटी ६९ लाखउदय (बांबडे)२ लाख ९२ हजार३ कोटी ५० लाखआजरा४ लाख २५ हजार५ कोटी ३१ लाखइको चंदगड२ लाख ८८ हजार२ कोटी ६१ लाखहेमरस५ लाख ४ हजार६ कोटी ५५ लाखकाय आहे ऊस खरेदी करकारखानदारांनी ऊस तोडून गाळपासाठी आणलेनंतर त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या दरावर पाच टक्केप्रमाणे खरेदी दर लावला जातो. कोल्हापूर जिल्ह्याचा साखर उतारा चांगला असल्याने किमान २४०० ते २५०० रुपये ऊस खरेदीवर कारखानदारांचे प्रतिटन द्यावे लागणार आहे व त्यावर प्रतिटन ऊस खरेदी कर लावला जातो.सहवीज प्रकल्प असणाऱ्या कारखानदारांचे काय?प्रत्यक्षात २००५ मध्ये ऊस खरेदी माफ करताना ज्या कारखान्यांनी सहवीज प्रकल्प सुरू केले आहेत, त्यांनाच हा ऊस खरेदीकर माफ होत होता. मात्र मागील वर्षी ऊस खरेदी कर सर्वच कारखान्यांना माफ केल्यानंतर सहवीज प्रकल्प असणाऱ्यांनी ओरड केल्यानंतर त्यांना १० वर्षांऐवजी ११ वर्षे ऊस खरेदीकर माफ केला होता. याही वर्षी सर्वच कारखान्यांना ऊस खरेदी माफ केल्याने सहवीज प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांचे आणखी एक वर्षे वाढवून ते १२ वर्षांपर्यंत करणार काय? याबाबत सहवीज प्रकल्पधारक कारखानदारांचे लक्ष लागले आहे.