शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासन होणार गतिमान !

By admin | Updated: January 7, 2015 00:05 IST

नव्या वर्षाची नवलाई : सर्व शासकीय कार्यालये 'मे'अखेर आॅनलाईन करण्याचा मानस

कोल्हापूर : नवीन वर्षात नवीन संकल्पना राबविण्याचा सर्वांनाच ध्यास लागलेला असतो, तसा तो जिल्हा प्रशासनालाही लागलेला आहे. ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’, अशी नागरिकांची झालेली भावना झटकून देऊन नव्या बदलांचा स्वीकार करत जिल्हा प्रशासन पुढे वाटचाल करणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आॅनलाईन होणार आहेत.संगणकावर सात-बारा उतारे देण्याचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. गतिमानता, नेटकेपणा, सहजता आणि कार्यालयाअंतर्गत समन्वय साधण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर राहणार आहे. त्यादृष्टीने नवीन इमारतीचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला लागली आहे. हे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. कोणती फाईल नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांकडे आहे, कोणत्या अधिकाऱ्यांकडे किती कामाचा वर्कलोड आहे याची सविस्तर माहिती आॅनलाईन दाखविणारी संगणक प्रणाली तयार आहे. ती फक्त अ‍ॅडॉप्ट करायची बाकी असून नजीकच्या काही दिवसांत हे कामही पूर्ण केले जाईल. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा व शिरोळ या चार तालुक्यांतील महसूल विभागाचे सर्व रेकॉर्ड स्कॅनिंग करण्यात आले आहे. ७/१२, फेरफार, ‘क’, ‘ड’, ‘ई’, जन्म-मृत्यू दाखले यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नुसता नंबर टाकला की, संपूर्ण रेकॉर्ड देता येईल अशा पद्धतीची माहिती संकलन करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासाठी २०१५ हे नवीन वर्ष नव्या नवलाईचे, नव्या बदलाचे असणार आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूर महापालिका, इचलकरंजीतील काम बाकीजमाबंदी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ७/१२ दाखले संगणकीकृत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. फक्त इचलकरंजी व कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील काम बाकी आहे. लवकरच आॅनलाईन ७/१२ दाखले मिळतील.