शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या वितरकांचा आज संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:40 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या कोल्हापूर शहरातील वितरकांनी दूधविक्रीच्या कमिशनमध्ये वाढीची मागणी करत आज, सोमवारी दूधविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या कोल्हापूर शहरातील वितरकांनी दूधविक्रीच्या कमिशनमध्ये वाढीची मागणी करत आज, सोमवारी दूधविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; त्यामुळे सुमारे लाख लिटर दूधविक्री ठप्प होण्याची शक्यता आहे. शनिवार (दि. २७) पर्यंत संघाने कमिशन वाढीचा निर्णय घेतला नाही तर ऐन ‘दिवाळी’त बेमुदत दूधविक्री बंद करण्याचा इशारा वितरकांनी रविवारी दिला.दुधाच्या खरेदी-विक्रीचे दर वाढत असल्याने त्या प्रमाणात विक्री कमिशन वाढवून द्यावे, अशी मागणी कोल्हापूर शहरातील वितरकांची आहे. शहरात रोज सव्वा ते दीड लाख लिटर दुधाची विक्री होते. पावणेदोन वर्षांपूर्वी संघाने प्रतिलिटर २0 पैसे कमिशन वाढवून दिले होते; पण दोन वर्षांत म्हैस दूध खरेदी व विक्री दरात पाच ते सहा रुपयांची वाढ झाली; पण कमिशन वाढले नाही. स्पर्धक ‘अमूल’चे प्रतिलिटर तीन रुपये, तर ‘शाहू’चे २.८० रुपये कमिशन आहे, त्याप्रमाणे द्यावे, अशी मागणी ‘गोकुळ’ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती; पण संघाने त्याकडे लक्ष न दिल्याने आज दूध वितरण बंद करण्याचा निर्णय वितरकांनी घेतला आहे.‘गोकुळ’च्या वितरकांतर्फे दुधाची आगाऊ रक्कम युथ बॅँक व पार्श्वनाथ बॅँकेत जमा केली जाते; पण रविवारी शहरातील ३00 हून अधिक वितरकांनी पैसे जमा केले नाहीत. दोन्ही बॅँकांच्या दारात कार्यक्षेत्रातील वितरक एकत्र आले होते. त्यांनी निदर्शने करून ‘गोकुळ’ने शनिवारपर्यंत कमिशन वाढविले नाहीतर ऐन ‘दिवाळी’त विक्री बंद करण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिला; त्यामुळे आज अनेक ठिकाणी ग्राहकांना दूध उपलब्ध होणार नाही. दरम्यान, ‘दूध ही अत्यावश्यक सेवा असून वितरकांनी अचानक दूध बंद केल्यान गैरसोय होणार आहे; त्यासाठी ‘गोकुळ’ने आज स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. ठिकठिकाणी दुधाचे टेम्पो उभे केले जाणार आहेत. त्याशिवाय एक टीमही तयार केली आहे.मागेल त्याला दूध !‘गोकुळ’ प्रशासनाने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘मागेल त्याला दूध’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १0 जणांची टीम तयार केली असून, किरकोळ विक्रेते व ग्राहकांनी त्यांना थेट संपर्क साधायचा आहे. अजय पवार (९३७१९८९८९८), हणमंत पाटील (८८०५१४६२६८), लक्ष्मण धनवडे (८६६८३७९०३६), प्रवीण देसाई (७४४७३८९६९६), सत्यजित पाटील (८९८३७०४०४०), संतोष पाटील (९६७३७७८०७६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘गोकुळ’ प्रशासनाने केले आहे.