पन्हाळा ते पावनखिंड या मार्गावरील डोंगरकपारीत अनेक वाड्या-वस्त्या आहेत. काही वाड्यांमध्ये चौथीपर्यंत, तर काही आठवीपर्यंत शाळा आहेत. येथील मुलांना शाळेसाठी जंगलातून ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागते. येथे पावसाळ्यात मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, दाट धुके असे वातावरण असते. अशा परिस्थितीत शाळेला जाणे खूपच त्रासदायक असते. येथील मुला-मुलींना शाळेला जाणे सुखकर व्हावे यासाठी लक्ष्मी सिव्हिलचे डायरेक्टर हेमंत शहा यांच्यापुढे रेनकोट वाटपची कल्पना मांडली. त्यांनी लगेच होकार दिला.
कोल्हापूर जिल्हा माउंटेनीअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स असोसिएशनने कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी आंबवडे, मालाई, धनगरवाडा, भाततळी विद्यामंदिर पावनखिंड या शाळांमधील १८० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी हेमंत शहा यांनी आपल्या कंपनीतर्फे जी मुले दहावीमध्ये चांगले मार्क काढून पास होतील, त्यांना सिव्हिल साईटला डिप्लोमा किंवा डिग्री करायचे असेल त्यांना शिक्षण व नोकरी देऊ, असे जाहीर केले. सर्व ग्रामस्थांनी याचे स्वागत केले. यावेळी हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, समिट ॲडव्हेंचरचे विनोद कांबोज व व्हरसाइट प्रायव्हेट लिमिटेडचे ऋषिकेश केसकर, भोला यादव, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
---
फोटो नं २१०८२०२१-कोल-पावनखिंड०१,०२
ओळ : कोल्हापुरातील हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनतर्फे पावनखिंड परिसरातील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
----