गोकूळ शिरगाव येथील क्रीडांगण येथे पिंपळाची व वडाची झाडे लावण्यात आली. उजळाईवाडीतील एकटी संस्था वृद्धाश्रम येथे फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी करवीर तालुकाप्रमुख विनोद खोत, उपतालुकाप्रमुख भगवान कदम, शांताराम पाटील, हलसवडे शिवसेना शाखाप्रमुख अभिजित पाटील, महिला दक्षिण तालुकाप्रमुख पूजा शिंदे, विभागप्रमुख बबलू शेख, सुशांत देसाई, शाखाप्रमुख भारत खोत, उमेश यादव ,बाबासो पवार, गोविंद सिंग उपस्थित होते.
फोटो : १९ गोकूळ शिरगाव मदत
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमत्त शिवसेना करवीर दक्षिणच्यावतीने गोकूळ शिरगाव भाजी मंडई येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख विनोद खोत, उपतालुकाप्रमुख भगवान कदम, शांताराम पाटील उपस्थित होते.