ते गारगोटी (ता भुदरगड) येथील आजी-माजी सैनिक पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार आणि भेटवस्तू वाटप या संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तूंचे वाटप आणि नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचे सत्कार करण्यात आले.
संस्थेच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल होण्यासाठी नवंनविन योजना आणि संपूर्ण अहवाल संस्थेचे अध्यक्ष नारायण देसाई यांनी आपल्या मनोगतातून मांडला. संस्थापक अध्यक्ष शामराव किरोळकर व संघटना संस्थापक अध्यक्ष गणपती देसाई यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी कर्नल विजयसिंह गायकवाड, एम. एन. पाटील, बी. जी. पाटील, सर्जेराव मेंगाणे, गोपाळ कांबळे, दत्तात्रय पाटील, तुकाराम देसाई, गोपाळ कुंभार, दत्तात्रय साळवी, लक्ष्मी देसाई आदींसह सर्व संचालक, कर्मचारीवृंद, सभासद उपस्थित होते.
फोटो ओळ
सभासदांना रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भेटवस्तू देताना आमदार आबिटकर, विजयसिंह गायकवाड, नारायण देसाई, गोपाळ कांबळे, किरण भोईटे.