कोपार्डे : खुपिरे (ता. करवीर) येथील शिवशंभो दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना गणेश उत्सवानिमित्त रोख रकमेच्या स्वरूपात भेट देण्यात आली. जवळपास चार लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच व संस्थेचे प्रवर्तक प्रकाश चौगले म्हणाले, दरवर्षी संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांना गौरी -गणपती व दीपावली सणासाठी पैशांची आवश्यकता असते. हे ओळखून दरवर्षी भिशीच्या स्वरूपात काही रक्कम कपात केली जाते. या रकमेवर व्याज व मुद्दल अशी एकत्र करून गणेशोत्सवकाळात ती सभासदांना वाटप करण्यात येते. यामुळे सभासद शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात.
यावेळी सरदार बंगे, चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळ उपस्थित होते. सेक्रेटरी अभिजित चौगले यांनी आभार मानले.
फोटो खुपिरे (ता. करवीर) येथील शिवशंभो दूध संस्थेच्या वतीने गणेशोत्सव भेट वाटप प्रकाश चौगले, सरदार बंगे यांच्या उपस्थित झाले.
१७ खुपीरे शिवशंभो दूधसंस्था