सावरवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त गणेशवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यानिकेतनच्या विद्यार्थांना करवीर तालुका भाजपच्यावतीने शुक्रवारी फळे वाटप करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात माजी सैनिक भिकाजी जाधव, दिलीप खाडे, सुभाष पाटील, शिवाजी बुवा, अजितसिंह चव्हाण, संभाजी पाटील, एसबी देवणे, रमेश खाडे आदी मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. यावेळी भिकाजी जाधव, शिवाजी बुवा, संभाजी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव यादव यांनी केले. ज्ञानदेव यादव यांनी आभार मानले.