कागल : ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ८ मधील जवळपास एक हजार कुटुबांना धान्य व साखरेचे वाटप करण्यात आले. नगरसेवक प्रवीण काळबर यांच्या समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
दोन किलो तांदूळ, दोन किलो गहू आणि एक किलो साखर असे पॅकिंग करून हे किट प्रत्येक कुटुबांला देण्यात आले. नामदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते काही कुटुंबांना प्रातिनिधिक स्वरूपात या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँक संचालक भय्या माने, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, प्रवीण काळबर, जावेद नाईक, इरफान मुजावर, नवाज मुश्रीफ, प्रवीण चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
संसारोपयोगी वस्तू वाटप...
शहरातील प्रभाग क्रमांक ८ हा नगरसेवक प्रवीण काळबर यांचा प्रभाग आहे. या प्रभागात गेल्यावर्षी कोरोना लाॅकडाऊन काळात प्रत्येक कुटुबांला दहा किलो धान्य, साखर, चहापूड, कडधान्ये, चटणी, मीठ असे किट प्रवीण काळबर यांनी दिले होते. कांदा-बटाटाही वाटण्यात आला होता. साडी वाटपही केले होते. यामुळे हा प्रभाग चर्चेत आहे.
फोटो.
कागलमध्ये प्रभाग क्रमांक आठमधील कुटुंबांना धान्याचे किट मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भय्या माने, प्रवीण काळबर उपस्थित होते.