शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना मुदतबाह्य जंतनाशकाचे वितरण

By admin | Updated: December 6, 2015 01:37 IST

इचलकरंजीतील अंगणवाडीतील प्रकार : आरोग्य केंद्रप्रमुखांना नोटीस

इचलकरंजी : गावभागातील अंगणवाडीमध्ये मुदतबाह्य जंतनाशके औषधे वितरीत केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ही औषधे नगरपरिषदेकडील आरसीएच केंद्राकडून दिल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात आरसीएच केंद्रप्रमुख डॉ. यास्मिन पठाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येथील जुना वैरण बाजारातील पालिकेच्या इमारतीत नगरपरिषद अर्बन आरसीएच नागरी आरोग्य केंद्र आहे. या केंद्रातून अंगणवाडीतील बालकांसाठी सेनझोल नावाचे जंतनाशक औषध वितरीत केले होते. हे वितरणअवधूत आखाडा, कलावंत गल्ली, त्रिशूल चौक, सारवान गल्ली व मुजावर गल्ली येथील अंगणवाड्यांमधून बालकांना देण्यात आली होती. ही औषधे मुदतबाह्य असल्याचे इम्रान मैंदर्गी या पालकाच्या निदर्शनात आले. त्यांनी या संदर्भात अन्य पालकांकडे चौकशी केली असता मुदत संपलेल्या २५ बाटल्या आढळून आल्या. औषधाची निर्मिती नोव्हेंबर २०१२ ची असून, आॅक्टोबर २०१४ रोजी त्याची मुदत संपली आहे. सुमारे १४ महिन्यांपूर्वी मुदत संपलेली असताना अशी औषधे बालकांना वाटल्याचा धक्कादायक प्रकाश घडल्याने पालिका प्रशासनास खडबडून जाग आली, तर काही अंगणवाड्यांतील सेविका व मदतनिसांनी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी औषधांचे वितरण थांबविले. आरसीएच केंद्राकडे काही पालकांनी विचारणा केली असता तेथे डॉ. पठाण यांनी पालकांशी हुज्जत घातली. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच उपमुख्याधिकारी पावन म्हेत्रे यांनी आरसीएच केंद्रात धाव घेतली. औषधांचा सीपीआर हॉस्पिटलकडून पुरवठा झाला आहे. मात्र, आलेली औषधे मुदतबाह्य नव्हती. या संदर्भात उपमुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांनी दिलेली माहिती अशी, एचएस २६ आणि एचआर १९७ अशा दोन बॅचची जंतनाशक औषधे मिळाली. त्यापैकी एक औषध एचएस २६ बॅचची मुदत ३१ डिसेंबर २०१५ आहे. या बॅचची औषधे आरसीएचकडून पुरविली आहेत; मात्र एस १९७ बॅचची मुदत आॅक्टोबर १४ मध्ये मुदत संपलेली औषधे कोठून आली व ती वितरीत कशी झाली याचा अहवाल अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल आणि त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)