शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खर्डा-भाकरी खाऊन शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:54 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी सीमाभागातील मराठी बांधवांनी रविवारी रॅली काढून दसरा चौकात ठिय्या आंदोलनस्थळी खर्डा-भाकरी खाऊन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. याशिवाय शिरोळ, राधानगरी तालुक्यांतीलही विविध गावांनी शक्तिप्रदर्शन दाखवीत ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने गेले वीस दिवस अखंडपणे ...

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी सीमाभागातील मराठी बांधवांनी रविवारी रॅली काढून दसरा चौकात ठिय्या आंदोलनस्थळी खर्डा-भाकरी खाऊन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. याशिवाय शिरोळ, राधानगरी तालुक्यांतीलही विविध गावांनी शक्तिप्रदर्शन दाखवीत ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने गेले वीस दिवस अखंडपणे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. अनेक मराठा समाजबांधव हातात भगवा झेंडा व डोक्यावर भगवी टोपी परिधान करून ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत. बुधवारी झालेल्या ‘कोल्हापूर बंद’नंतर या आंदोलनाची धग वाढत आहे.रविवारी दुपारी महाराष्टÑ सीमाभागातील मांगूर (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी रॅली काढली. सकाळी मांगूर ग्रामस्थांनी गावातून मराठा आरक्षणाचा जागर करीत दुपारपर्यंत कोल्हापुरात दसरा चौक गाठला. त्यावेळी ‘जय भवानी- जय शिवाजी,’ ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे...’ अशा घोषणा देत व्यासपीठावर ठिय्या आंदोलन केले. या ग्रामस्थांचे नेतृत्व निवृत्त पोलीस उपअधीक्षक मोहन माने यांनी केले. यावेळी मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी खर्डा-भाकरी-दही खाऊन शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी उपस्थित सुमारे एक हजाराहून अधिक जणांनी खर्डा-भाकरीचा लाभ घेतला. यामध्ये आदित्यराज डफळे, विनायक शिंदे, अमरसिंह बागल, कुणाल इंगळे, धनराज शिंदे, दिग्विजय घोरपडे, रविराज निंबाळकर, संजय घाटगे, चंद्रकांत पाटील अनंतसिंह शितोळे, विनायक घोरपडे, आदींचा समावेश होता.राधानगरी-भुदरगड मतदारसंघाचा वरचष्माया आंदोलनाची धग वाढत असतानाच रविवारी राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील ग्रामस्थांचा वरचष्मा दिसून आला. या भागातील ठिकपुर्ली, मजरे, कासारवाडा, कपिलेश्वर, पालकरवाडी, कसबा वाळवे, आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये कसबा वाळवेचे सरपंच अशोक फराकटे, उपसरपंच सुनील मांडवकर यांचाही समावेश होता.बर्फीचेही वाटपराधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथील प्रसिद्ध बर्फीचे बॉक्स ग्रामस्थ घेऊन आले होते. त्यांनी या प्रसिद्ध बर्फीचे उपस्थितांमध्ये वाटप केले. त्यावेळी त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने साऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी हे ग्रामस्थ दुचाकी रॅलीने कोल्हापुरात ठिय्या आंदोलनस्थळी आले होते.शिरोळकरांनीही लक्ष वेधलेसकल मराठा समाज शिरोळ ग्रामस्थांच्या वतीने गावात रॅली काढून कोल्हापुरात दसरा चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला. त्यामध्ये धैर्यशील माने-पाटील, चंद्रशेखर पाटील, किशोर पाटील, यशवंत देसाई, एस. माने, आदींचा सहभाग होता.