शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तायक्वाँदोतील वाद संपुष्टात

By admin | Updated: July 13, 2016 00:51 IST

महासंघाची निवड : अध्यक्षपदी चेतन आनंद, उपाध्यक्षपदी विनायक गायकवाड

शिरगाव : भारतीय तायक्वाँदो महासंघामध्ये अधिकृत संघटना कोणती? असा गेले काही वर्षापासून सुरु असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या निर्देशानुसार २६ जून रोजी नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या तायक्वाँदो महासंघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे वकील चेतन आनंद यांची निवड झाली असून, तायक्वाँदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे विनायक गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतीय तायक्वाँदो महासंघाचे माजी पदाधिकारी हरिशकुमार यांच्या पॅनेलचा पराभव झाल्याने भारतीय तायक्वाँदो महासंघ या अधिकृत संघटनेच्या कार्यकारिणीला भारतीय आॅलिम्पिक महासंघाने मान्यता दिली आहे. दि. २४ नोव्हेंबर २०१४ रोजी भारतीय तायक्वाँदो महासंघाच्या तत्कालीन अध्यक्षा रेणू महंत यांच्याविरुध्द विशेष सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव मंजूर झाल्याने वाद निर्माण झाला. घटनाबाह्य कामे, भ्रष्टाचार, नियमबाह्य अ‍ॅकॅडमीची स्थापना व अनेक गैरव्यवहारांमुळे तायक्वाँदो पदाधिकाऱ्यांतध्ये विरोधी लाट तयार झाली. सर्वत्र निर्माण झालेल्या समांतर अनधिकृत संघटनांमुळे अधिकृत संघटना कोणती? याबाबत देशभरातील खेळाडू, पालक, क्रीडा संघटक यांच्यात संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर विनायक गायकवाड यांनी देशभरातील २६ राज्य संघटना पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या निर्देशानुसार निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. यावेळी झालेल्या निवडणुकीत राज ककाटी व हरिशकुमार यांचे पॅनलमध्ये लढत झाली. यामध्ये राज ककाटी यांचे पॅनेलने सर्व १७ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर अध्यक्षपदी अ‍ॅड. चेतन आनंद, उपाध्यक्ष विनायक गायकवाड, सचिव प्रभात शर्मा (झारखंड), कोषाध्यक्ष सोकून सिंग (अरुणाचल प्रदेश), आर. डी. मंगेशकर (गोवा), टी. प्रवीणकुमार (कर्नाटक), इशारी के. गणेश (तामिळनाडू), सहसचिव संजयकुमार शर्मा, डी. एन. पंगोत्रा, दीपक मंदेकर यांच्यासह सदस्यपदी त्रिलोक सुब्बा, संतोषकुमार माहंरी, विनोदकुमार, सुरेश परमार, तारा तागिन, अनिल भार्गव, पी. स्टॅलीन यांची निवड करण्यात आली आहे. (वार्ताहर)