कोल्हापूर : आराम बस आणि चारचाकी गाडीची धडक झाल्यानंतर दोन चालकांमध्ये झालेल्या वादामुळे दाभोलकर कॉनर्र परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, दाभोलकर कॉर्नर परिसरात रात्री थांबलेल्या एका आराम बसला एका चारचाकीची धडक बसली. यानंतर दोन्ही चालकांच्यामध्ये वाद सुरू झाला, तसेच बसमधील प्रवासीही खाली उतरले. त्यांनी या दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु हे दाेघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे येथे गर्दी झाली. वाहतुकीची कोंडी झाली. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि या दोघाही वादावादी करणाऱ्या चालकांना पोलीस ठाण्यात आणले.