शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगात अस्वस्थता

By admin | Updated: March 3, 2015 00:35 IST

अर्थसंकल्पात तरतूदच नाही : देशात दोन नंबरचा उद्योग असूनही दुर्लक्ष

इचलकरंजी : देशातील बहुतांश राज्यांमध्ये असणाऱ्या वस्त्रोद्योगासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची तरतूद किंवा कर व अनुदान प्रणालीमध्ये बदल असल्याचा उल्लेख नसल्याने येथील वस्त्रोद्योग व्यवसायात अस्वस्थता पसरली आहे. शेतीनंतर रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाच्या पदरात निराशाच पडली आहे.वस्त्रोद्योगाची व्याप्ती महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, आदी राज्यांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत, वापी अशी मोठी वस्त्रोद्योगाची केंद्रे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाची खास दखल घेतली जाण्याची अपेक्षा होती. वस्त्रोद्योगातील सर्वच घटक उद्योजकांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष होते.वस्त्रोद्योगात आधुनिक तंत्रज्ञान आणणाऱ्या टेक्निकल अप ग्रेडेशन फंड (टफ्स) ही योजना सरकारने गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ राबविली. त्यामुळे हजारो कोटी रुपये अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या आयातीमध्ये गुंतवले गेले. त्याचा परिणाम म्हणून कपडा व तयार कपडे निर्यात होऊन आपल्या देशाला परकीय चलन मिळाले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या योजनेंतर्गत नवीन उद्योजकांनी केलेल्या प्रस्तावांना अनुदान मिळेनासे झाले आहे. योजनेतील ३० टक्के अनुदानाची रक्कम न मिळाल्याने अनेक उद्योजकांची बॅँकांच्या कर्जाची खाती थकबाकीत गेली आहेत. त्यांच्यावर जप्तीची टांगती तलवार आहे, अशा परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात खासदार राजू शेट्टी व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील आॅटोलूम ओनर्स असोसिएशनचे एक शिष्टमंडळ केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त किरण सोनिगुप्ता यांना भेटले होते. त्यांनी टफ्सअंतर्गत करण्यात आलेल्या प्रस्तावांचा जानेवारीअखेर निपटारा केला जाईल व अनुदान संबंधितांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती; पण फेब्रुवारी महिना संपला तरीसुद्धा आणि केंद्रीय अर्थसंकल्पात त्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने आता टफ्सअंतर्गत प्रस्ताव करणारे उद्योजकसुद्धा धास्तावले आहेत.अशा पार्श्वभूमीवर आता अन्य राज्यांपेक्षा महाग असलेली वीज एप्रिल महिन्यापासून आणखीन महाग होणार असल्याने महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगात आणखीन एक संकट नव्याने उभे राहिले आहे. याचा परिणाम म्हणून वस्त्रोद्योगामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)भविष्य अंधकारमयवस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार भरीव तरतूद करेल, अशी अपेक्षा असताना अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाचा साधा उल्लेखही नसल्याने उद्योजक नाराज झाले आहेत, अशी प्रतिक्रिया यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली. फक्त बड्या उद्योजकांवरच सरकारची मेहरनजर असल्याचे या अर्थसंकल्पात दिसून येत आहे. त्यामुळे सर्वाधिक रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाचे भविष्य अंधकारमय झाल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.