कोल्हापूर : युथ डेव्हलपमेंट बँकेतर्फे तसेच अरुण नरके फाऊंडेशन व कोल्हापूर व्यापारी आघाडीच्या यांच्या सहकार्याने सामजिक बांधिलकीतून शाहुपुरी आणि लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील पूरग्रस्त दुकानांची निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
पुराचे पाणी दुकानात शिरून दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखल, घाण तसेच दुर्गंधी पसरली आहे. सर्व व्यापारी व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यासाठी दुकाने आणि व्यापारी संस्थांची स्वच्छता करत आहेत. यावेळी स्वच्छता पूर्ण झालेली दुकाने आणि बाहेरच्या परिसरात औषध फवारणी तसेच ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत आहे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रघुनाथ सूर्यवंशी, अधिकारी आनंदराव माने, अभिजीत भोईटे, कुलदीप कुंभार यांच्यासह कोल्हापूर व्यापारी आघाडीचे संतोष लाड, सुधीर खराडे, धनंजय शिंदे, संजय चराटे, समाधान काळे आदी उपस्थित होते.
बँकेचे संचालक चेतन नरके यांच्या मार्गदर्शनाखाली महापुराने बाधित झालेल्या शाहुपुरी आणि लक्ष्मीपुरीमधील सर्व ठिकाणी हा उपक्रम राबविणार असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
फोटो ओळी : युथ बँकेच्यावतीने कोल्हापूर शहरात निर्जंतुकीकरण माेहीम राबविण्यात आली. (फाेटो-३००७२०२१-कोल-युथ बँक)