शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

‘सिद्धगिरी’वर निरोगी आरोग्याची पहाट

By admin | Updated: January 23, 2015 00:36 IST

रामदेवबाबांच्या योग शिबिराला गर्दी : आबालवृद्ध भारावले; आज समारोप

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून विविध विषयांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असलेल्या सिद्धगिरी मठाच्या परिसरात आज, गुरुवारी वेगळे चैतन्य संचारले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या तेजस्वी वाणी आणि कृतीतून प्रतीत होणारे सदृढ, सशक्त आणि निरोगी आयुष्याचे रहस्य जाणून घेताना याठिकाणी जमलेल्या आबालवृद्ध कृतार्थतेने भारावले होते. रामदेवबाबा यांच्याकडून योग व प्राणायामचे धडे घेताना जणू त्यांच्या समृद्ध आरोग्याची पहाट उगवली. कोवळी किरणे आणि बोचऱ्या थंडीच्या साक्षीने सुमारे अडीच तासांच्या शिबिरात रामदेवबाबा यांनी उपस्थित आबालवृद्धांना कपालभाती, अनुलोम-विलोम, योगिक-जॉगिंग, सूर्य नमस्काराचे धडे दिले शिवाय विनोदाच्या कोट्या करत निरोगी, सदृढ आणि समृद्ध भारताची संकल्पना मांडली. मठाच्या परिसरात साकारलेल्या ‘राजर्षी शाहू महाराज नगरी’तील मुख्य मंडपात शिबिरासाठी पहाटे साडेतीन वाजल्यापासून गर्दी होऊ लागली. उद्या, शुक्रवारी समारोप होणार आहे.(प्रतिनिधी)रामदेवबाबा म्हणाले...जितके लोक औषधे न खाता आजारी पडतात. त्यापेक्षा औषध खाऊन आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासह रक्तदाब, शुगर, आदींवर प्राणायाम हा चांगला पर्याय आहे.आयुष्यात संन्यासी झाल्यानंतरच मुक्ती मिळते. त्यात संन्यासी होणे म्हणजे लोभ, माया, काम आणि क्रोध सोडणे, पण त्यासाठी अंतर्गत ‘कनेक्टिव्हिटी’ असावी लागते आणि ती योगा, प्राणायामातून मिळते.विश्वास भंग होत असल्याने कुटुंबासह समाज दुभंगला जात आहे. ते धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्यावर इतरांचा विश्वास कायम राहील या पद्धतीने वर्तन ठेवावे.