शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण घराचेच स्वास्थ्य हरवणारा आजार : मुलाच्या संगोपनामध्ये पालकांची चौफेर कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 01:00 IST

आई नोकरी करत असेल तर वडिलांना किंवा वडील नोकरी करत असतील तर आईला असे यांच्यापैकी एकालाच अर्थार्जनासाठी, नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडता येते. त्यामुळे घराचा आर्थिक डोलारा सांभाळताना नाकीनऊ येतात.

ठळक मुद्देजीवघेणा मस्क्युलर डिस्ट्राफीडोलारा सांभाळताना नाकीनऊ

समीर देशपांडे ।कोल्हापूर : हा आजार मुलाला होणे म्हणजे त्या मुलाच्या पालकांच्या चौफेर कसोटीचाच हा काळ असतो. शारीरिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक अशा सर्वच पातळ्यांवर या पालकांना रोजचा दिवस युद्धासारखाच भासत असतो.

हा आजार झालेली मुले स्वत:साठी ग्लासभर पाणीही घेऊ शकत नाहीत; त्यामुळे सातत्याने त्यांच्यासोबत कुणीतरी एकजण थांबणे आवश्यक ठरते. त्यामुळे आई नोकरी करत असेल तर वडिलांना किंवा वडील नोकरी करत असतील तर आईला असे यांच्यापैकी एकालाच अर्थार्जनासाठी, नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडता येते. त्यामुळे घराचा आर्थिक डोलारा सांभाळताना नाकीनऊ येतात.

रात्री झोपताना उद्याचा दिवस आपल्या मुलासाठी काय घेऊन उजाडणारा आहे, याची काळजी वाटतच पालक झोपी जातात. एक तर माझ्या मुलाला या यातनांमधून मुक्त कर किंवा तो बरा होईल असे काहीतरी कर, अशी प्रार्थना ईश्वराकडे करण्याशिवाय या पालकांच्या हातात काहीही नसते.दोघेही जर नोकरीला असतील तर अशा मुलाला व्हीलचेअरवर बसविणे, त्याच्यासाठी खाऊची व्यवस्था करणे, टी.व्ही. कॉम्प्युटरची सोय करून देणे आणि बाहेरून कुलूप लावून जाणे असे करणारेही पालक आहेत; परंतु नोकरी करत असताना आपल्या घरातील ‘अशा’ मुलाची काळजी त्यांना किती त्रास देत असेल, याचा विचार न केलेला बरा.

अशा मुलांना कुठेही बाहेर न्यायचे म्हटले की त्यांना उचलून न्यावे लागते. त्यांना घराबाहेर आणून सक्तीने चारचाकी गाडी किंवा रिक्षातच बसवावे लागते. कुठेही गेले तरी पुन्हा उचलूनच खाली घ्यावे लागते. हा सगळा प्रकार टाळण्यासाठी पालक घराबाहेर, सार्वजनिक कार्यक्रमांना जाण्याचे टाळतात.अनेक पालकांना बोजड झालेल्या अशा मुलाला सातत्याने उचलण्यामुळे मणक्याचा त्रास सुरू झाल्याची उदाहरणे आहेत.

एकीकडे शारीरिक पातळीवर हे हाल सुरू असताना असे अनेक पालक या आजाराविषयी योग्य माहिती नसल्याने अंगारे, धुपारे, गंडा, दोरा, देशी औषधे, मांत्रिक, बाबा यांतही अडकतात आणि स्वत:चे आर्थिक नुकसानही करून घेतात.या आजाराचे विविध प्रकार‘ड्युशेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ हा सर्वसाधारणपणे मुलांमध्ये आढळतो आणि त्याची लक्षणे लहानपणीच पाहावयास मिळतात. ‘बेकर मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ हा उशिरा लक्षात येतो. ‘लिंब गर्डेल मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ हा आजाराचा प्रकार उशिरा लक्षात येतो; त्यामुळे तो मोठ्यांमध्येही आढळतो. यांचे आयुष्यमान अधिक असते. या आजारातील ‘ड्युशेन’, ‘बेकर’ ही या आजारांबाबत संशोधन करणाऱ्या संशोधकांची नावे आहेत.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल