शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पोलीस कारवाईने ‘स्वप्नवेल’चा प्रश्न चर्चेत

By admin | Updated: January 20, 2015 23:41 IST

चंदगड तालुका : महसूल, वनविभागाने ठोस कार्यवाही करण्याची गरज

नंदकुमार ढेरे - चंदगड -तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोेंगररांगेत वसलेल्या व निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या तिलारी परिसरात उदयास आलेल्या ‘स्वप्नवेल पॉर्इंट’ याठिकाणी ३१ डिसेंबरच्या रात्री चंदगड पोलिसांनी छापा टाकून बेकायदा पार्टी करणाऱ्या २४ जणांना अटक केली. चंदगड पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर ‘स्वप्नवेल’च्या एकू ण स्थापनेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्याचे काश्मीर असलेल्या पारगड, तिलारी परिसरात निसर्गाचे वरदान लाभले आहे. या ठिकाणी वनविभागाने कोदाळी वनव्यवस्थापन समितीच्या सहकार्याने ग्रीन व्हॅली पार्क, कोदाळीजवळील रातोबा पॉर्इंट विकसित केले आहे, तर अगदी जंगल कपारीत दरीच्या काठावर बशीर कोतवाल (बेळगाव) याने विकसित केलेला ‘स्वप्नवेल पॉर्इंट’, अशी ही निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण बनली आहेत. तिलारीपासून धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर कालव्याच्या समांतर रस्त्याने गेल्याने ६ किलोमीटर अंतरावर स्वप्नवेल पॉर्इंट हे स्थळ आहे. ज्या ठिकाणी हा पॉर्इंट विकसित झाला आहे, हे ठिकाण परदेशातही नसावे. खोल दरी, वर्षभर फेसाळत पडणारे धबधबे, गर्द झाडी, थंडगार हवा, असे नयनरम्य वातावरण येथे आहे .बशीर कुतबुद्दीन कोतवाल (रा. जाधवनगर, बेळगाव) याने हा पॉर्इंट विकसित केला आहे. मात्र, या पॉर्इंटच्या सभोवताली साधारण आठ एकर जागा वनविभागाची आहे. असे असताना मध्येच स्वप्नवेल पॉर्इंट म्हणून विकसित केलेली जागा कोतवाल याने कशी खरेदी केली? या जागेचा मूळ मालक कोण? जागा केव्हा खरेदी केली? ती कायदेशीर आहे का? इतर खात्याच्या परवानगी घेतल्या आहेत का? असे अनेक प्रश्न चंदगड पोलिसांच्या कारवाईनंतर प्रकाशझोतात येत आहेत.‘स्वप्नवेल’ हा नयनरम्य परिसर असल्याने याठिकाणी येणाऱ्या तालुक्यातील पर्यटकांसह कर्नाटक (बेळगाव) व गोव्यातील पर्यटकांची संख्या मोठी आहे. यामध्ये बेळगाववरून येणाऱ्या महाविद्यालयीन युवक-युवतींची संख्या मोठी आहे. याठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय असल्याने येथे पर्यटनाच्या नावावर अनेक गैरप्रकार चालत असल्याची चर्चा आहे. लोकवस्तीच्या संपर्कापासून जंगलात निर्जनस्थळी गोवा व कर्नाटक सीमेलगत असल्याने या पर्यटनस्थळाचा वापर अवैध धंद्यांसाठीही करण्यात आला आहे का, याबाबतही सखोल चौकशीची गरज आहे.३१ डिसेंबरला रात्री पार्टीत दंग असलेल्या २४ जणांना अटक करून चंदगडचे पोलीस निरीक्षक अंगद जाधवर यांनी याठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध प्रकारांना वाचा फोडली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी, मंडळींतून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.वाटेबाबत न्यायालयात वाद : तळवडेकर‘स्वप्नवेल’ची जागा जरी मालकाने आपल्या नावावर करून घेतली असली तरी त्याठिकाणी जाणारी वाट ही वनविभागाच्या जागेतूनच जाते. ही वाट २००२ साली वनविभागाने बंद केली आहे. त्याबद्दल कोतवालाने या वाटेचा वाद न्यायालयात दाखल केला आहे. परंतु, वनविभाग आपल्या मताशी ठाम आहे, अशी माहिती पाटणे विभागाचे वनक्षेत्रपाल एस. बी. तळवडेकर यांनी दिली.पोलिसांनी कारवाई थांबवू नये ‘स्वप्नवेल’ या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली आणखी काय गैरप्रकार चालतात का? पर्यटनाच्या नावाखाली याठिकाणी कोण-कोण येते, याची चौकशी चंदगड पोलिसांनी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.‘स्वप्नवेल’च्या सभोवती वनविभागाची जागा आहे; पण मध्येच कुतबुद्दीन याने कशी काय जागा खरेदी केली, याबाबत वनविभाग व महसूल विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.