शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अमन मित्तल यांच्या बदलीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या बदलीच्या चर्चेने जोर धरला आहे. मात्र ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होणार की अन्यत्र जाणार, याचीही मोठी उत्सुकता आहे.

मित्तल यांनी १६ ऑगस्ट २०१८ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. कमी वयातील अधिकारी आणि त्यांनी आधी जिल्हा परिषदेकडे काम न केल्याने सुरुवातीला त्यांना येथील वातावरण नवखे होते; परंतु नंतर ते सरावले. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्यांच्याकडे महत्त्वाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना आता दोन वर्षे पाच महिने पूर्ण झाले आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा विचार करून त्यांची बदली थांबली होती. दरम्यान, मित्तल हे दौलत देसाई यांच्या बदलीनंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणार असल्याची चर्चा गेले दोन महिने जिल्हा परिषदेत सुरू आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची भूमिका जिल्हाधिकारी नियुक्तीमध्ये महत्त्वाची राहणार आहे. त्यांनीही मित्तल यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदासाठी अन्य नाव पुढे आणल्याने सध्या हा विषय प्रलंबित ठेवण्यात आल्याचे समजते. आता कोरोनाचा संसंर्ग कमी झाला आहे. मित्तल हे बदलीसाठीही पात्र आहेत. त्यामुळे येत्या महिन्या, दोन महिन्यांत त्यांची बदली निश्चित मानली जाते. फक्त ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून येणार की अन्यत्र जाणार, याची उत्सुकता आहे.

चौकट

संजयसिंह चव्हाण यांची ‘सीईओ’पदासाठी चर्चा

दरम्यान, सध्या जलस्वराज्यमध्ये कार्यरत असलेले संजयसिंह चव्हाण यांच्या नावाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदासाठी जोरदार चर्चा आहे. चव्हाण हे गडहिंग्लजचे प्रांताधिकारी म्हणून याआधी कार्यरत होते. त्यानंतर ते सांगली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी व पुणे विभागीय कार्यालयात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना गेल्याच महिन्यात आयएएस केडर मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा जोरात आहे.