शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

चर्चेतील मुलाखत : कोल्हापुरात जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचा शोध - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST

शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचे संशोधन मौलिक ठरणार आहे. सहा वर्षांचा अभ्यास आणि तीन वर्षांचा प्रत्यक्ष ...

शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचे संशोधन मौलिक ठरणार आहे. सहा वर्षांचा अभ्यास आणि तीन वर्षांचा प्रत्यक्ष फिल्डवरील अनुभव यामुळे मी संशोधित केलेले जैविक खत चांगले परिणाम दाखवत आहे.

- सुप्रिया कुसाळे, कोल्हापूर

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वळीवडे (ता. करवीर) येथील सुप्रिया कुसाळे या राजाराम महाविद्यालयातील विद्यार्थिनीने जैविक खतावर केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ऑफ न्यू दिल्लीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत या संशोधनाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पिकांचे उत्पादन, वाढ आणि जमिनीची गुणवत्ता सुधारणाऱ्या जीवाणूच्या संशोधनानिमित्त तिच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न : राष्ट्रीय पातळीवर नावाजले गेलेले हे नेमके संशोधन काय आहे?

उत्तर : मी राजाराम महाविद्यालयात २०१४पासून ‘इको फ्रेंडली ॲन्ड काॅस्ट इफेक्टिव्ह प्रॉडक्शन ऑफ फायटेज प्रोड्युसिंग बायोईनॉक्लन्ट ॲन्ड इफिशिअन्ही इन फिल्ड’ या विषयावर पीएच.डी. करत आहे. हे करताना संशोधनाअंती जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश घेऊन त्याचे रूपांतर पिकांच्या वाढीसाठी करण्यात एक जीवाणू महत्त्वाचा असल्याचे आढळले. प्रयोगशाळेत त्याची कृत्रिमपणे वाढ करून ती प्रत्यक्षात जमिनीत सोडली. त्याचे परिणाम चांगले आल्याने संशोधनाचा व्याप अधिक वाढवला. सध्या बाजारात सेंद्रिय आणि असेंद्रिय खते उपलब्ध आहेत. खासकरून सेंद्रिय खतांना मागणी वाढली आहे. पण सध्या बाजारात उपलब्ध असलेली बायो फर्टिलायझर्स ही असेंद्रियसाठी उपयुक्त ठरत नाहीत, असे आढळल्याने दोन्हींना एकाच धाग्यात गुंफणारे संशोधन पुढे आणण्यावर भर दिला. यातून जीवाणूचा शोध लावला.

प्रश्न : जीवाणूचे संवर्धन व वापर कसा होतो?

उत्तर : हे जीवाणू द्रव स्वरुपात तयार केले आहे. जमिनीत पुरेसे ओल असताना त्याची आळवणी केल्याने पिकांवर त्याचा चांगला परिणाम दिसला आहे. खासकरून ऊस, मका, ज्वारी, मिरची, आले, हळद, भात या पिकांच्या उत्पादनामध्ये दहा टक्केपर्यंत वाढ झाल्याचे दिसले आहे. फुलझाडांमध्ये भरपूर फुटवे व फुले येण्यासाठीही हे जीवाणू उपयोगी ठरत आहेत.

प्रश्न : हे जीवाणू नेमके काम कसे करतात?

उत्तर: जमिनीत खते टाकली जातात, पण ती सर्व पिकांना लागू होतातच असे नाही. मृत स्वरुपात असणारे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस, झिंक यांना परत सक्रिय करुन त्यांचा उपयोग पिकांच्या उत्पादन वाढीसाठी करण्याचे काम हे जीवाणू करतात. ताग, धैंच्या यासारखी हिरवळीची खते व गांडूळ, शेणखताच्या वापरामुळे मुळातच हे जीवाणू जमिनीत तयार होतात. पण अलिकडे ही पारंपरिक खते कमी वापरली जात असल्याने या जीवाणूंचे प्रमाण घटले असून, जमिनीची सुपीकताही खालावत चालली आहे. आता नव्याने संशोधन करत हे जीवाणू द्रवस्वरुपात पुन्हा जमिनीत सोडून जमीन पुन्हा एकदा सुपीक बनवता येते.

चौकट ०१

सुप्रिया प्रकाश कुसाळे या शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील शेती करतात, भाऊ एमबीए झाला आहे. आई गृहिणी आहे. घरच्या शेतीच्या अनुभवासह मुलगी नवे संशोधन करत आहे? म्हटल्यावर वडील कुसाळे यांनीही ठामपणे पाठीशी उभे राहात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संशोधन पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट ०२

कुसाळे हिने केलेले हे संशोधन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याने आणि पिकांमध्ये त्याची उपयुक्तताही आढळून आल्याने भविष्यात व्यापारी तत्वावर त्याचे उत्पादन करण्याचा त्यांचा विचार आहे. शिवाय त्यांनी गेल्यावर्षी याचे पेटंटही मिळवले आहे. फोटो: ०९०१२०२१-कोल-सुप्रिया कुसाळे