शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

शेट्टी-आवाडे-मंडलिक यांच्यात चर्चा-ऊसदराबाबत चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:25 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी शनिवारी जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे व हमीदवाडा कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी ऊसदराबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली. शेट्टी यांनी पहिल्या उचलीबाबत प्रस्ताव द्यावा, त्याबाबत आम्ही सर्व कारखानदारांशी चर्चा करू, असे आवाडे व मंडलिक यांनी सांगितले; परंतु शेट्टी यांनी तसे ...

ठळक मुद्देसर्व कारखानदारांसमवेत एकत्र बैठक घेण्याचा शेट्टींचा प्रस्तावऊसदराच्या आंदोलनात सरकार व कारखानदारांनी शेतकºयांची कोंडीकारखानदाराशी चर्चा करण्यापेक्षा तुम्ही सर्वच कारखानदारांना बोलवा व तिथे एकत्रित चर्चा करू.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी शनिवारी जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे व हमीदवाडा कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी ऊसदराबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली. शेट्टी यांनी पहिल्या उचलीबाबत प्रस्ताव द्यावा, त्याबाबत आम्ही सर्व कारखानदारांशी चर्चा करू, असे आवाडे व मंडलिक यांनी सांगितले; परंतु शेट्टी यांनी तसे न करता सर्व कारखानदारांसमवेतच एकत्रित बैठक घ्यावी, तिथे चर्चा करू, असा प्रस्ताव दिला आहे.

शुक्रवारी येथील एका हॉटेलमध्ये कारखानदारांची बैठक झाली होती. त्यामध्ये आवाडे यांनी शेट्टी यांचा पहिल्या उचलीचा नक्की किती रकमेचा प्रस्ताव आहे, हे जाणून घ्यावे व त्यावर कारखानदारांची बैठक घेऊन चर्चा करावी, असे ठरले होते. त्यानुसार शनिवारी आवाडे यांनी शेट्टी यांच्याशी संपर्क साधला; परंतु व्यक्तिगत एका कारखानदाराशी चर्चा करण्यापेक्षा तुम्ही सर्वच कारखानदारांना बोलवा व तिथे एकत्रित चर्चा करू. पहिल्या उचलीबाबत मी लवचिक असल्याचे सुरुवातीपासूनच सांगितले असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.त्यानंतर सायंकाळी शेट्टी यांची संजय मंडलिक यांच्याशी भेट झाली.

ऊसदराच्या आंदोलनात सरकार व कारखानदारांनी शेतकºयांची कोंडी केल्यास ती फोडण्याचे काम आतापर्यंत दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांनी केले; हीच परंपरा तुम्ही पुढे न्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले. त्यास मंडलिक यांनीही प्रतिसाद दिला. आवाडे व मी कारखानदारांशी एकत्रित बोलून तुमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवितो व चर्चा घडवून आणू, असे आश्वासन मंडलिक यांनी दिले. सांगलीतील कारखानदारांची आज, रविवारी बैठक होत आहे. त्यामुळे तिथे काय होते हे पाहून आज, रविवारी किंवा उद्या, सोमवारी याबाबत पुढील घडामोडी होण्याची शक्यता आहे.हालसिद्धनाथ कारखान्याच्या पहिल्या उचलीबाबत साशंकता१ निपाणी (ता. चिकोडी) येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेल्या ३१५१ रुपयांच्या पहिल्या उचलीबाबत साखर कारखानदारांतून शनिवारी साशंकता व्यक्त केली. त्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनाही काहींनी फोन करून उचलीबाबत विचारणा केली.२ या कारखान्याची आर्थिक स्थिती अडचणीची आहे. गतवर्षी कारखान्याने ३००० रुपयांच्या उचलीची घोषणा केली. त्यातील २७०० रुपये दिले; परंतु नंतरचा ३०० रुपयांचा हप्ता वेळेत मिळाला नसल्याची तक्रार आहे. कारखान्यात ५०० कामगार आहेत. त्यांचा आॅगस्टपासूनचा पगार थकीत आहे. अशा स्थितीत या कारखान्याने एवढी उचल कशी जाहीर केली व ते ही रक्कम देणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.३ यंदा ऊस कमी आहे व उचल घसघशीत जाहीर नाही केली; तर पुरेसे गाळप होणार नाही, असा विचार करून ही घोषणा केल्याचे सांगण्यात येते. कर्नाटकात संचालक मंडळाने दराबाबत काही निर्णय घेतला तरी त्यास कार्यकारी संचालकांची मंजुरी असल्याशिवाय तो अंतिम मानला जात नाही. हा प्रस्ताव कार्यकारी संचालकांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे समजते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तुम्ही याबाबत अध्यक्षांशी बोलावे, असे सुचविले व बोलण्यास नकार दिला.