शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

टोलबाबत चर्चेस वेळ द्यावा

By admin | Updated: November 5, 2014 00:30 IST

कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘शब्द’ पाळण्याची विनंती

कोल्हापूर : भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे घेतलेल्या सभेत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे, कोल्हापूरकरांची नेमकी मागणी व या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळास वेळ द्यावा, अशी मागणी आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्यावतीने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व निमंत्रक निवास साळोखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे पत्र कृती समितीने एक नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री कार्यालयास पाठविले आहे.पत्रात म्हटले आहे, ‘कोल्हापूरच्या अन्यायी टोल प्रश्नाबाबत आपणास पुरेपूर माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुम्ही कोल्हापूरकरांना टोलमुक्तीचे आश्वासन दिले. यासाठी भाजपला जनतेने मतदान करण्याचे आवाहनही केले होते. याप्रमाणे भाजपला जनतेने निवडून देत, राज्यातील सत्ताही दिली आहे. कोल्हापूरकरांच्या सुदैवाने टोलमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आपणाकडेच राज्याची सत्तासूत्रे आली आहेत. त्यामुळे कोल्हापूरला टोलमुक्त करून न्याय द्याल, असा विश्वास आहे.’आघाडी शासनाच्या काळात साडेचार वर्षे कोल्हापूरकरांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. अजूनही या प्रश्नासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनास पूर्णविराम देण्यासाठी ‘टोलमुक्त कोल्हापूर’ हाच पर्याय आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिष्टमंडळास भेटीसाठी आपल्या सोयीची वेळ द्यावी, कोल्हापूरकरांचे रास्त मागणे ऐकून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१ आॅक्टोबरला पदाची शपथ घेतली. त्यानंतर १ नोव्हेंबरला दुपारी मुंबईतील मंत्रालयात हे पत्र पाठविले आहे. पत्र रजिस्टर्ड व मेलही केले आहे. ते सचिवांपर्यंत पोहोचले आहे. मुख्यमंत्री नागपूरहून आल्यानंतर याबाबत उत्तर अपेक्षित आहे. - निवास साळोखे,(निमंत्रक कृती समिती)