शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जदार शेतकरी केंद्राच्या सवलतीला मुकले

By admin | Updated: April 13, 2017 21:53 IST

कर्जमाफीकडे डोळे : ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याचा फटका; तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ नाही

प्रताप महाडिक --कडेगाव -कर्जमाफीच्या अपेक्षेने बहुतांशी शेतकऱ्यांनी सेवा सोसायट्यांसह बँकांच्या पीककर्जाची ३१ मार्चअखेर परतफेड केलेली नाही. १ एप्रिल २०१६ नंतर घेतलेले परंतु ३१ मार्च २०१७ पर्यंत फेडलेले एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने होते, तर एक ते तीन लाखापर्यंतचे कर्ज एक टक्का व्याजाने होते. हे कर्ज परतफेड न केलेले शेतकरी केंद्राच्या व्याज सवलतीलाही मुकले आहेत. आता ३० जूनपर्यंत या शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली, तर त्यांना राज्य शासनाच्या तीन टक्के व्याजमाफीचा फायदा मिळणार आहे.सोसायट्या व बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या जास्तीत जास्त एक लाखापर्यंतच्या कर्जाला केंद्र शासन तीन टक्के, तर राज्य शासन तीन टक्के व्याज सवलत देते. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा फायदा मिळतो. दरम्यान, एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जावर कें द्र सरकार तीन टक्के, तर राज्य शासन एक टक्का व्याज सवलत देते. त्यासाठी शेतकऱ्यांनी एप्रिलनंतर पीककर्ज काढून मार्चअखेरपर्यंत त्याची परतफेड करणे गरजेचे होते. मार्चअखेरपर्यंत कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळत नाही. पुढे जूनपर्यंत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त राज्य शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ मिळतो. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल या आशेने ३१ मार्चअखेर कर्ज परतफेड केलेली नाही. त्यामुळे सोसायट्या आणि बँकांच्या कर्ज वसुलीवर परिणाम झाला आहे. आता या शेतकऱ्यांनी जून २०१७ अखेर कर्ज परतफेड केली नाही, तर ही पीककर्जे थकबाकीत जातील. कर्जमाफी झाली नाही, तर थकबाकीदार शेतकऱ्यांना १०.५० टक्के व्याज आणि दंडव्याज असा भुर्दंड बसणार आहे.शेतकरी दरवर्षी थकबाकी नको म्हणून ३१ मार्चपूर्वी कशी तरी कर्ज परतफेड करतात. काही शेतकरी उसनवार किंवा व्याजाने पैसे घेऊन भरतात आणि कर्ज जुन्याचे नवे करून घेतात. परंतु यावर्षी कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत कर्ज परतफेड केली नाही.सरसकट कर्जमाफी : अन्यथा आंदोलनशासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसह नियमित मुदतीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी दिलीच पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.