शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सृष्टिसौंदर्याचा मोह बनेल संकटांचा डोह!

By admin | Updated: August 5, 2014 00:08 IST

आनंद घ्या दुरून : धबधब्यात उतरणे, कड्यावर उभे राहणे, घाटात वाहने थांबविणे धोक्याचेच

परळी : डोळ्यांना आणि मनाला सुखावणारा निसर्ग कितीही मनमोहक वाटत असला तरी निसर्गाचे स्वत:चे काही नियम असतात. ते नियम मोडणाऱ्यांना शिक्षा ही मिळतेच. सृष्टिसौंदर्याला भुलून कोणी मर्यादा ओलांडली तर अघटित घडणारच. ठोसेघर परिसरात सध्या निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी पर्यटकांचा लोंढा वाढू लागला आहे. डोंगरकपऱ्यांतून कोसळणारे धबधबे, भुरभुणारा पाऊस, हिरवेगार गालिचे, धुक्यांची दुलई, भिजलेल्या रानवाटा सारं काही भुरळ पाडणारं; पण ही रानभूल धोक्याची ठरू शकते. निसर्गाचा आविष्कार अनुभवण्यासाठी राज्यभरातील पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात ठोसेघर परिसराला भेट देतात. सध्या निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी पर्यटकांचा लोंढा वाढू लागला आहे. यामध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. सुटीच्या निमित्ताने पर्यटन सहलींची आयोजन करून युवक-युवती, नवदाम्पत्य याठिकाणी येत आहेत. निसर्गाचा आनंद लुटत असताना अनेकदा समोरच्या धोक्याची कल्पनाही येत नाही. पावसामुळे पाऊलवाटा निसरड्या झालेल्या असतात. पाय घसरून अपघात घडू शकतो. दुरून सुंदर दिसणारा निर्झर जवळून पाहिलाच पाहिजे, असा अट्टाहास अंगाशी येऊ शकतो. शेवाळलेल्या खडकांवरून घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे भलते धाडस न केलेलेच बरे. (वार्ताहर)पाण्याच्या प्रवाहात उतरणे टाळाडोंगरमाथ्यावरून वाहणारे ओव्हळ दरीतून वेगाने वाहत असतात. त्यामुळे खडकांची झिज होऊन त्यांना धार आलेली असते. त्या प्रवाहात उतरून फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. पण यामुळे दुखापत होऊ शकते. पाण्याच्या डोहात उतरणेही टाळले पाहिजे.मद्य प्राशन हवे कशाला?निसर्गसौंदर्यातच एवढी नशा आहे की ते पाहणारा तल्लीन होऊन जातो. यासाठी कुणाला मद्यप्राशन करण्याची गरजच काय? पण तरीही काही पर्यटक मद्य प्राशन करून रस्त्यात धिंगाणा घालत असतात. ज्याठिकाणी माणसाला आपला तोल सांभाळत चालावे लागते, तेथे मद्यपींची काय गत होईल, याचे भान ठेवायला हवे. घाटातील मौज धोकादायकघाटातील रस्ते अरुंद असतात. रस्त्यावर गाडी थांबविली तर मागून येणाऱ्या वाहनाला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. यातच घाटात धुके पसरल्यामुळे पुढचे काहीच दिसत नाही. अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते. रानवाटेवरून जरा जपूनपावसाळ्यात चिखलामुळे रानवाटा निसरड्या झालेल्या असतात. नागमोडी वाटांवरून भटकंती करताना घसरून आपटण्याची वेळ येऊ शकते.