शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वीस शाळांत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By admin | Updated: February 15, 2015 23:47 IST

प्रशासनाचा उपक्रम : विद्यार्थी, शिक्षकांबरोबरच पालकांचाही सहभाग

कुंभोज : भूकंप, पूर, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीदरम्यान प्राप्त परिस्थितीशी कसा सामना करावा, याबाबत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून नेहमीच मिळतात. तथापि, शाळा पातळीवर आकस्मिकपणे तसेच याहून वेगळ्या असणाऱ्या आपत्तींना सक्षमपणे तोंड देता यावे, या हेतूने शिक्षकांसह विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणअंतर्गत पुण्याच्या नागरी संरक्षण दलामार्फत हातकणंगले व पन्हाळा तालुक्यातील प्रत्येकी दहा शाळांत सुरक्षा कवायतीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.केरळमधील कुंभकोणम् येथील आग तसेच नुकत्याच पाकिस्तानातील पेशावर येथे शाळेतील विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे. शाळा तसेच शाळेच्या परिसरात भूकंप, आग, विषबाधा, चेंगराचेंगरी, पूर, वीज पडणे, बॉम्बस्फोट, अपघात, आदी आपत्ती केव्हाही निर्माण झाल्यास अशा आपत्तींना तोंड देण्याच्या सक्षम यंत्रणा आजही अस्तित्वात नाहीत. यासाठी हा उपक्रम राबविला.प्राधिकरणाकडून प्रयत्नआपत्तीला सामोरे जाण्यासाठी सराव कवायतीद्वारे विद्यार्थी, शिक्षकांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. शारीरिक व मानसिक तयारी उपलब्ध करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील रांगोळी, इंगळी, रुई, चंदूर, हिंगणगाव, खोची, घुणकी, जुने चावरे, जुने पारगाव, नीलेवाडी, तर पन्हाळ्यातील मल्हारपेठ सावर्डे, असंडोली, आकुर्डे, गोठे, अंबुर्डे, बोरगाव, माणगाव, सातवे सावर्डे, काखे, अशा वीस गावांतील प्राथमिक शाळांत पुण्यातील नागरी संरक्षण दलाच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थी-शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आले.