कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रंगत वाढू लागल्याने देशपातळीवर अनेक नेत्यांची किमान दररोज एक सभा जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परराज्यातून पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण केले आहे. प्रशासनाने बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची पुरेशी निवाऱ्याची सोय केलेली नाही. पाणी व प्रसाधनाची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी पोलिसांना ठेवले आहे. नागरी संरक्षणासाठी घरदार सोडून आलेल्या पोलिसांची व्यथा सोडविण्यासाठी प्रशासनाला लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे.आठवडाभर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभांचा फड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी कोल्हापुरात हजेरी लावली आहे. यासाठी जिल्ह्यातील पोलीस बळ कमी पडत असल्याने मुंबईसह परराज्यांतील पोलिसांना पाचारण केले आहे. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत हा फौजफाटा राहणार आहे.
बंदोबस्ताच्या परराज्यातील पोलिसांची गैरसोय
By admin | Updated: October 10, 2014 23:02 IST