शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांत घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: December 27, 2014 00:04 IST

इचलकरंजीत मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र..अधिकारी स्वच्छता अभियानात तर दिसत नाहीत

अतुल आंबी -इचलकरंजी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात करून स्वत:पासूनच स्वच्छतेला सुरुवात केली. त्यानंतर सर्व शासकीय कार्यालयांना स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले. स्वच्छतेबाबत शपथही दिली. तरीही इचलकरंजीत मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. अधिकारी स्वच्छता अभियानात तर दिसत नाहीत आणि त्यांच्या कार्यालयाचा परिसरच घाणीच्या विळख्यात सापडला आहे.‘लोकमत’ने बुधवारी (दि.२४) शहरात विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य कॅमेऱ्यात कैद केले. केंद्र शासनामार्फत सूचना असतानाही शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कार्यालयांच्या परिसरातच अस्वच्छता दिसत आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून दर रविवारी शहरातील विविध सार्वजनिक परिसरात कार्यकर्त्यांसमवेत स्वच्छता अभियान राबवितात. छायाचित्रात कैद केलेल्या काही शासकीय कार्यालयांच्या परिसरातही हाळवणकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वच्छता अभियान राबविले होते. मात्र, त्यानंतरही त्या कार्यालयांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वच्छता कायम ठेवली नसल्याचे दिसत आहे. शहरातील प्रांत कार्यालय, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, भूमापन कार्यालय, पुरवठा कार्यालय, बीएसएनएल, आयजीएम, आदींसह अनेक शासकीय कार्यालये अस्वच्छ असल्याचे आढळले. केंद्र शासनामार्फत आलेल्या सूचना पाळाव्यात; अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा आदेश नसल्यामुळेच कदाचित अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष केले असावे, असे नागरिकांतून बोलले जात आहे. १) इचलकरंजीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालय व भूमापन कार्यालय या दोन्ही कार्यालयांमध्ये असलेल्या स्टेडियममध्ये जाण्याच्या मार्गावर पाण्याच्या बाटल्या, चहाचे कप यांसह अन्य वस्तू टाकून, तसेच गुटखा व पान खाऊन थुंकून परिसर गलिच्छ करण्यात आला आहे. २) बीएसएनएल कार्यालयाभोवती नेहमीच कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. ३) नगरपालिकेच्या आयजीएम रुग्णालयाच्या परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरले आहे.