शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची दिशा आज ठरणार

By admin | Updated: November 19, 2016 01:07 IST

बार असोसिएशनची बैठक : सहा जिल्ह्यांतील वकील बैठकीला उपस्थित राहणार

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी विविध मार्गाने आंदोलने करण्याचा निर्धार वकील बांधवांनी कोल्हापुरात केला. आज, शनिवारी होणाऱ्या सहा जिल्ह्यांतील बारच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. या बैठकीत वकिलांची मते जाणून घेण्यात आली. पाच जिल्ह्यांतील बैठकीत सर्किट बेंचच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. बैठकीच्या सुरुवातीला सेक्रेटरी अ‍ॅड. सर्जेराव खोत यांनी, अवमान याचिका सुनावणी व सर्किट बेंच हे दोन विषय या बैठकीत घेण्यात आले आहे. माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी, कोल्हापूरवगळता उर्वरित जिल्ह्यांतील वकिलांनी यापूर्वीचे उच्च न्यायालयाला अंडर टेकिंग दिलेले आहे. त्यामुळे शनिवारच्या बैठकीतच चर्चा करून सर्वांनुमते निर्णय घ्यावा, असे सुचविले. माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी, सरकारला जाग आणण्यासाठी रोज शांततेच्या मार्गाने पाच वकिलांचे साखळी उपोषण न्यायालयाच्या दारात करावे. त्यानंतर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण व महामार्ग रोकोसारखे आंदोलन करावीत, अशी सूचना केली.अ‍ॅड. कोमल राणे , माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते यांचे भाषण झाले. बैठकीस माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी राणे, अ‍ॅड. शिवराम जोशी, अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. पिराजी भावके, जॉर्इंट सेक्रेटरी अ‍ॅड. अंशुमन कोरे, लोकल आॅडिटर अ‍ॅड. प्रशांत पाटील, अ‍ॅड. यतिन कापडिया, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील यांनी आभार मानले.————-==================फोटो : १८११२०१६-कोल-बार असोसिएशन =======================