शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याण विभागाच्या योजना मागासवर्गीय समाजातील घटकांपर्यंत पोहचविणे आवश्यक : दिलीप कांबळे

By admin | Updated: May 15, 2017 17:35 IST

सिंधुदुर्गात विविध विकास कामांचा आढावा

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. १५ : समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीय समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात या योजना त्यांच्या पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे केले. येथील विश्रामगृहावरील सभागृहात आयोजित बैठकीत सामाजिक न्याय, अल्प संख्यांक विकास विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सावळकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त जे. एम. चाचरकर उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाच्या विकास योजना लाभार्थीपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळावा यासाठी विभागाने विशेष प्रयत्न करावेत असे सांगून कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विहित वेळेत मिळावी यासाठी विभागाने प्रयत्न करावे. तसेच बचत गटांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी बचत गटांचे मेळावे आयोजित करावेत. देवगड येथील वस्तीगृहाचे काम लवकरात-लवकर पूर्ण करुन येत्या शैक्षणिक २0१७ पासून या वस्तीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु होईल यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रयत्नशील राहावे असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विकास महामंडळ तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला. या बैठकीला माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्हटकर, कोकण आर्थिक विकास महामंडळाचे साळस्कर, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या श्रीमती नाईक आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.