शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘जांभूळवाडी’ प्रकरणी ‘सीईओं’चा दणका

By admin | Updated: June 18, 2015 00:36 IST

फौजदारीचा आदेश : राजकीय दबाव झुगारून कारवाई

कोल्हापूर : जांभूळवाडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी सरपंचांसह १४ जणांवर फौजदारी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले आहेत. पन्हाळा तालुक्यातील सातवे पेयजल योजनेतील गैरव्यवहारातील फौजदारीच्या आदेशानंतर दुसरा दणका सीईओंनी जांभूळवाडी गैरव्यवहार करणाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळाबाजांमध्ये खळबळ माजली आहे. राजकीय दबाव झुगारून सीईआेंनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे.ठेकेदार तानाजी नारायण शेंडगे, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष, सरपंच शंकर रामा देसाई, सचिव महादेव रवळू नौकुडकर, महिला विकास समिती अध्यक्षा मंजुळा मुसळे, सामाजिक लेखापरीक्षण समिती अध्यक्ष शिवाजी आप्पा चव्हाण, ग्रामीण नळ पाणीपुरवठा समिती सदस्य वैशाली बाळू सरोळकर, महादेव गोविंद सुळेभावीकर, संगीता संजय कांबळे, तुकाराम रामचंद्र देसाई, संजय जोतिबा कांबळे, जनाबाई शिवराम कांबळे, द्वारकाबाई व्हळ्याप्पा कांबळे, सुलोचना रामचंद्र खामकर, दत्तू बाबू देसाई, महादेव परसू आवडणकर (रा. जांभूळवाडी) यांच्यावर फौजदारी करण्याचा आदेश आहे. लघुसिंचन विभागाचे उपअभियंता गुन्हा दाखल करणार आहेत. या प्रकरणी कनिष्ठ शाखा अभियंता एस. एस. नाईक, उपअभियंता ए. के. पाटील यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे.जांभूळवाडी गावातील या पाणी योजनेसाठी एक कोटी १५ लाख मंजूर झाले होते. या योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थ बाजीराव देसाई यांनी केली. त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, आंदोलने, मोर्चा काढला. मात्र, ठेकेदाराला राजकीय आश्रय असल्याने ठोस कारवाई होत नव्हती. दरम्यान, अभियंता जी. डी. कुंभार यांनी चौकशी करून योजनेतील गैरव्यवहाराचा अहवाल सादर केला. अहवालात कंत्राटदार तानाजी शेंडगे यांना अदा केलेल्या ४३ लाखांमधील २८ लाखांची कामेच झाली नसल्याचे पुढे आले तसेच विहीर खुदाई, वाळू, आरसीसी पाईप, कॉफर डॅम, स्ट्रेंच गॅलरी साहित्य यामध्ये मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)रक्कम जमा करूनच शेंडगे अडकलेप्रशासनाने कारवाईच्या नोटिसीचा दणका देताच शेंडगे यांनी २८ लाख रुपये ज्या खात्यावरून काढले होते, त्या खात्यावरच जमा केल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. कारवाईतून सुटका करून घेण्यासाठीच त्यांनी पैसे भरले आहेत. मात्र, पैसे भरून चुकीची कबुलीही अप्रत्यक्षपणे दिली. कारवाईसाठी पैसे भरल्याचा आयता, भक्कमपणे पुरावा प्रशासनाला मिळाला. त्यामुळे फौजदारीचा आदेश दिला आहे. याशिवाय ठेकेदार शेंडगे यांनी शासकीय पैसे नियमबाह्यपणे वापरल्याचा आणखी एक ठपकाही ठेवण्यात आला आहे.