शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘दिलबहार (अ)’ अंतिम फेरीत

By admin | Updated: March 31, 2015 00:36 IST

१९ व्या मिनिटास दिलबहार(अ)च्या करण चव्हाण-बंदरेने सचिन पाटीलच्या पासवर गोल करीत १-० अशी आघाडी निर्माण केली.

कोल्हापूर : दिलबहार तालीम मंडळ (अ)ने चुरशीच्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळावर ३-१ अशी मात करीत दसरा कप फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. छत्रपती शाहू स्टेडियम येथे सोमवारी दिलबहार (अ) विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात उपांत्य फेरीतील सामना झाला. १९ व्या मिनिटास दिलबहार(अ)च्या करण चव्हाण-बंदरेने सचिन पाटीलच्या पासवर गोल करीत १-० अशी आघाडी निर्माण केली. एका गोलच्या दबावात बालगोपालच्या सततच्या आक्रमणामुळे ३९ व्या मिनिटास ऋतुराज पाटीलच्या पासवर रोहित कुरणे यास गोल करण्यात यश आले. त्यामुळे सामन्यात बालगोपाल संघाने १-१ अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात दिलबहार संघाकडून गणेश दाते, सचिन पाटील, जावेद जमादार, सणी सणगर, करण चव्हाण-बंदरे, माणिक पाटील यांनी आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. ४८ व्या मिनिटास सचिन पाटीलच्या पासवर जावेद जमादारने उत्कृष्ट गोलची नोंद करीत सामन्यात २-१ अशी आघाडी आपल्या संघास मिळवून दिली. या आघाडीमुळे बालगोपाल संघाने गोल फेडण्यापेक्षा बचावावर भर दिला. दिलबहार संघाच्या जावेद जमादारने मोठ्या डी बाहेरून मिळालेल्या फ्री कीकवर मारलेला फटका बालगोपालचा गोलरक्षक नीलेश भोई याने अत्यंत चपळाईने बाहेर काढला. ९० व्या मिनिटास दिलबहारच्या करण चव्हाण-बंदरेने अनिकेत जाधवच्या पासवर उत्कृष्ट मैदानी गोलची नोंद करीत संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवत दिलबहार (अ)ने दसरा कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.आजचा सामना दु. ४ वा. फुलेवाडी विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या दसरा कप फुटबॉल स्पर्धेत सोमवारी दिलबहार (अ) व बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण.