शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर सेवा रुग्णालयात डिजिटल एक्स-रे शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST

कोल्हापूर : येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयात लेबॉरेटरीसोबत आता माफक दरामध्ये डिजिटल एक्स-रे ही सुविधा ...

कोल्हापूर : येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयात लेबॉरेटरीसोबत आता माफक दरामध्ये डिजिटल एक्स-रे ही सुविधा उपलब्ध झाली असून, या डिजिटल एक्स-रे मशीनचे उद्घाटन सोमवारी सातारा येथील शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते झाले.

गुजरी येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत गुजरी येथे सेवार्थ रुग्णालय चालविले जाते. येथे अतिशय माफक दरात रुग्णांची तपासणी केली जाते, तसेच येथील प्रयोगशाळेत विविध चाचण्या कमी खर्चात केल्या जातात. आता कोल्हापूर विभागातील पहिले डिजिटल एक्स-रे मशीन महावीर सेवा धाम येथे सर्वांच्या सेवेकरिता उपलब्ध झाले असून, ही सेवाही अतिशय माफक दरात उपलब्ध झाली आहे.

येथील महावीर सेवा धामच्या सभागृहात झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात सातारा येथील लाभार्थी परिवार शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते या डिजिटल एक्स-रे मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आचार्यदेव श्री महासेन सूरीश्वरजी महाराज उपस्थित होते. जगभरात कोरोनासारख्या महामारीने समाज त्रासलेला असताना सेवा धाममार्फत सुरू असलेले हे मानव सेवेचे कार्य असेच अखंड चालू राहू दे, असा आशीर्वाद यावेळी महाराजांनी दिला. गणिवर्य विक्रमसेन महाराज आणि साध्वीजी ऋजूप्रज्ञाश्रीजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या प्रसंगी सातारा येथील सुभाष दोशी, प्रफुल्ल दोशी परिवार, अंबालालजी राठोड परिवार, डॉ. मनाली बाफना, डॉ. वरूण बाफना, सीमंधर कोविड केअरचे ट्रस्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महावीर सेवा धामचे अध्यक्ष विनोद ओसवाल, नरेंद्र राठोड, अमर गांधी, दिलिप गांधी, प्रवीणभाई मणियार, वसंतभाई शाह तसेच महावीर सेवा धामचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

--------------------------------------

फोटो : 21062021-kol-bhagwan mahavir trust x ray.jpg

फोटो ओळ : कोल्हापूर येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयातील डिजिटल एक्स-रे मशीनचे उद्घाटन सोमवारी सातारा येथील शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आचार्यदेव श्री महासेन सूरीश्वरजी महाराज उपस्थित होते.