शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम मराठी साहित्याचे होणार डिजिटायझेशन

By admin | Updated: January 3, 2017 01:09 IST

दुर्मीळ ग्रंथांचे जतन : जगभरातील संशोधकांना उपयुक्त; कथा, कादंबरी, ललित वाङ्मय लेखनाचा समावेश

संतोष तोडकर-- कोल्हापूर --मुस्लिम बोर्डिंग हाऊस येथे मे महिन्यात सुरू करण्यात आलेल्या मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्रातील ग्रंथांचे, पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून, त्यामुळे त्यांचे जतन होण्यासह जगभरातील संशोधकांना ते आॅनलाईन उपलब्ध होणार आहे.मुस्लिम मराठी साहित्यात नवलेखक घडावेत, त्यांना प्रेरणा मिळावी व दर्जेदार साहित्यनिर्मिती व्हावी तसेच समग्र साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या हेतूने मेमध्ये या केंद्राची स्थापना करण्यात आली. मुस्लिम मराठी साहित्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रात सद्य:स्थितीला ७०० हून अधिक पुस्तकांचा संग्रह करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘विश्वस्त समाजाचे’, ‘माझ्या गावचं गाणं’, डॉ. अजिज नदाफ यांचे ‘शाहीर अमर शेख’ यासह वेगवेगळ्या परिप्रेक्षांत व कालावधीत समाजाचे केलेले चित्रण, सार्वभौम मुस्लिम अस्मिता, जीवनशैली, सर्वसमावेशक इस्लाम संस्कृती, इतिहास, समस्या, भविष्यातील आव्हाने यांवर आधारित कथा, कादंबरी, ललित वाङ्मय लेखनाचा समावेश आहे.पंधराव्या शतकापासून मुस्लिम मराठी संतसाहित्याची परंपरा आढळते. या कालखंडात सुमारे ४९ मुस्लिम-मराठी संतकवी होऊन गेले. शहा मुंतोजी, ब्रह्मणी, बाबा शेख महंमद, हुसेन अंबरखान, अलमखान अशा मोजक्याच संतकवींच्या रचना आज उपलब्ध आहेत. साहित्य आणि समाज या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो. समकालीन वर्तमान वास्तवाला घेऊन पुढे जात आहे. डॉ. यू. म. पठाण, हमीद दलवाई, मुबारक शेख, डॉ. रफिक सूरज, समर खडस यांच्यासह अनेक साहित्यिकांनी त्या-त्या काळातील वास्तवाची मांडणी आपल्या साहित्यकृतींमधून केली आहे. आज महाराष्ट्रात सुमारे ५०० ते ६०० मुस्लिम लेखक आहेत. या सर्व लेखकांची किमान दीड ते दोन हजारांहून अधिक ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. अशा वेगवेगळ्या कालावधींत मुस्लिम मराठी लेखकांचे साहित्य अभ्यासकांना उपलब्ध व्हावे यासाठी त्याचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी खासदार संजय काकडे यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर यांनी मदतीचा हात दिला आहे. सध्या केंद्राकडे असलेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी लेखक, प्रकाशक यांच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्यासह विखुरलेल्या मुस्लिम मराठी साहित्यिकांशी संपर्क साधण्यात येत असून, लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.- गणी आजरेकर, चेअरमन, मुस्लिम बोर्डिंग हाऊस